WhatsApp Scammers: व्हॉट्सअॅपवर काही महिन्यांपूर्वीच ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यांतर आता फंक्शनल एक्सटर्नल लिंक पाठवता येण्याचा ऑप्शन दिल्याने या सर्वाचा गैरवापर काहीजण करत आहेत. सायबर गुन्हेगार याच्या मदतीने युजर्सना एक सोपा सर्व्हे भरुन बक्षीस जिंकता येईल असं आमिष दाखवून त्यांचे खाजगी आणि बँक डिटेल्स घेऊन फसवणूक करत आहेत. "Rediroff.com" किंवा "Rediroff.ru" या प्रकारच्या लिंकच्या मदतीने या फसवणूकी होत असल्याचं समोर आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार सायबर गुन्हेगार व्हाट्सअॅप यूजर्सना एक लिंक पाठवतात ज्यामध्ये हा दावा केला जातो की यूजर्स एक सोपा सर्वे भरून बक्षीस जिंकू शकतात. यूजर्सद्वारा प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतर त्यांच्या समोर एक वेबसाईट ओपन होते. ज्यात यूजर्सना त्यांचे नाव, वय, पत्ता आणि बॅंकेची माहिती अशाप्रकारचे डिटेल्स भरायला सांगितलं जातं. ज्यानंतर त्याच माहितीद्वारे त्यांची फसवणूक केली जाते. 


या मेसेजसकडेही करा दुर्लक्ष


व्हॉट्सअॅपवर सध्या सक्रिय असलेल्या आणखी एका घोटाळ्यात "सॉरी, मी तुम्हाला ओळखत नाही" किंवा "तुम्ही कोण आहात हे मला कळू शकेल" असे सायबर क्राइम मेसेज करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. स्कॅमर त्यांच्याशी संभाषण सुरू करतो आणि यूजर्सना बरे वाटण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांचे कौतुकही करतो त्यानंतर स्कॅमर त्यांचे वैयक्तिक तपशील उघड करण्यासाठी त्यांना फूस लावून त्यांची खाजगी माहिती घेतली जाते. ज्यानंतर त्यांची फसवणूक केली जाते.


तुम्ही रिपोर्टसुद्धा करू शकता


जर तुम्हाला अलीकडेच असे काही मेसेज येत असतील तर व्हाट्सअॅपवर स्वत:ची फसवणूक होण्यापासून वाचवण्याकरता काही टिप्स आहेत. यामध्ये तुम्हाला मेसेज पाठवणारा माहित नसल्यास त्याने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करु नका. त्यानंतर ज्या नंबरवरून तुम्हाला मेसेज मिळाला आहे त्या नंबरला ब्लॉक करुन रिपोर्ट करा. 


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


[yt][/yt]