Year Ender 2021 : 2021 वर्षाला निरोप देण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झालं आहे. 2022 वर्ष उजाडण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना प्रत्येकजण हे वर्ष कसं गेलं आणि येणारं वर्ष काय घेऊन येईल याबद्दल विचार करत आहे. अशात आपण सारेच सर्वाधिक वेळ घालवत असलेल्या मोबाईलमध्ये जगभरात सर्वात जास्त कोणते अॅप्स डाऊनलोड करण्यात आले? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


एपटोपिया (Apptopia) या कंपनीने नुकतीच 2021 वर्षात मोबाईलमध्ये सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या विविध अॅप्सबाबतचा अहवाल जाहीर केला. यामध्ये गेमिंग अॅप, लाईव्ह स्ट्रिमिंग अॅप, सोशल मीडिया अॅप अशा विविध प्रकारच्या अॅप्सचा समावेश आहे.  या रिपोर्टनुसार तब्बल 656 मिलियन डाउनलोडसह टिकटॉक हे अॅप सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेलं अॅप आहे. त्यानंतर सोशल मीडिया अॅप्सचा विचार करता इन्स्टाग्राम, फेसबुक, वॉट्सअॅप आणि टेलीग्राम हे अॅप्स सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आले. तर ओटीटी अॅप्समध्ये नेटफ्लिक्स (173 मिलियन), यूट्यूब (166 मिलियन),  डिज्नी प्लस (126 मिलियन) आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (120 मिलियन) हे अॅप्स सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेलं अॅप्स आहेत. यानंतर भटंकती संबधित अॅप्समध्ये गूगल मॅप्सने बाजी मारली आहे. तर मुज्यिक अॅप्समध्ये स्पॉटिफाय अॅप सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलं.


सर्वाधिक डाऊनलोड केलेले टॉप 10  अॅप्स



  1. टिकटॉक (656 मिलियन)

  2. इन्स्टाग्राम (545 मिलियन)

  3. फेसबुक (416 मिलियन)

  4. वॉट्सएप (395 मिलियन)

  5. टेलीग्राम (329 मिलियन)

  6. स्नॅपचॅट (327 मिलियन)

  7. जूम (300 मिलियन)

  8. स्पॉटिफाय (203 मिलियन)

  9. सबवे सर्फर (191 मिलियन)

  10. रोलॉक्स (182 मिलियन)


गेम्समध्ये सबवे सर्फरची हवा


यानंतर गेम्सचा विचार करता सर्वाधिक डाऊनलोड केलेला गेम सबवे सर्फर (191 मिलियन) ठरला आहे. त्यानंतर रोलॉक्स (182 मिलियन), ब्रिज रेस (169 मिलियन), गरने फ्री फायर (144 मिलियन) आणि अमंग अस (152 मिलियन थे) हे गेम आहेत. विशेष म्हणजे पबजी आणि बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया टॉप 10 मध्ये नव्हता. याशिवाय शॉपिंग अॅप्सचा विचार करता सिंगापूरचा शोपी (203 मिलियन) हा अॅप सर्वात वर आहे. त्यानंतर शीन (190 मिलियन), मीशो (153 मिलियन) या अॅप्सचा समावेश असून 2020 मध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा अॅमेझॉन हा अॅप यंदा 148 मिलियन डाउनलोड्सह चौथ्या स्थानावर आहे. 



हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha