Apple Iphone : अॅपल कंपनीचे (Apple) फोन अर्थात आयफोन (iPhone) यांचे फोन सर्वात आधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखले जातात. या फोन्सचे अनेक चाहते आहेत. अॅपल त्यांच्या फोन्समध्ये देत असलेले आधुनिक फिचर्स यामागील कारण आहे. पण आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अॅपल कंपनी त्यांचे तीन मॉडेल्स बंद करणार आहे. यामध्ये आयफोन 6 (iPhone 6s), 6एस प्लस (Iphone 6s Plus) आणि एसई (Iphone SE) या मॉडेल्सचा समावेश आहे. या मॉडेल्सना कंपनी तात्काळ बंद करणार नसली तरी त्यांना विन्टेज प्रोडक्टसमध्ये टाकणार असून विन्टेज प्रोडक्ट्सचे अपडेट्स येत नाहीत.
कंपनी बंद करत असलेले आयफोन 6 (iPhone 6s), 6एस प्लस (Iphone 6s Plus) आणि एसई (Iphone SE) हे तीन मॉडेल्स अनेकांकडे असून अनेकांना हे फोन फार आवडतात. त्यामुळे कंपनी लगेचच हे मॉडेल बंद करेल असे नाही या मॉडल्सची विक्री आधीच बंद झाली असली तरी आता त्याचे अपडेट येणंही बंद होणार आहे.
युजर्संना 'हा' तोटा
कंपनी बंद करणार असलेल्या या तीन प्रोडक्ट्सच्या वापरकर्त्यांना तोटा म्हणजे या प्रोडक्ट्सचे पार्टस लवकर मिळणार नाहीत. त्यामुळे रिपेअरिंगच्या वेळेस अडचणी निर्माण होणार तसंच कंपनीकडून सिक्यूरीटी आणि ओएस अपडेट येणं बंद झाल्यामुळे सॉफ्टवेअरसंबधी इश्यूसही ठिक होणार नाहीत.
संबंधित बातम्या :
- iPhone Production Stop : iPhone आणि iPad चा होणार तुटवडा? कंपनीने केले 'या' कारणामुळे उत्पादन बंद
- Bulletproof iPhone : बंदुकीच्या गोळीचाही सामना करणार Bulletproof iPhone 13, जाणून घ्या किंमत
- Made in India Iphone 13 : आता आयफोन 13 तयार होणार भारतात, लवकरच निर्मितीला सुरुवात
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live