मुंबई : 'मेटा'चा संस्थापक मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) व्हॉट्सअॅप (WhatsApp) संबंधित तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे यूजर्सना त्यांच्या चॅटिंगवर अधिक नियंत्रण मिळणार असून त्यांची प्रायव्हसी अधिक अबाधित राहणार आहे. यामुळे आता तुम्ही कुणालाही न समजता तुम्हाला नको असलेला व्हॉट्सअॅप ग्रुप सोडू शकता, त्यातून बाहेर पडू शकता. तसेच तुम्ही ऑनलाईन आहात का याची माहिती कुणापर्यंत मर्यादित ठेवायची आणि मेसेजचे स्क्रीनशॉट्स यासंबंधित माहिती या नव्या फिचर्समधून आपल्याला मिळणार आहे.


मार्क झुकरबर्गने म्हटलं आहे की, तुमचे मेसेज किंवा चॅट हे सुरक्षित राहण्यासाठी, त्यावर तुमचे नियंत्रण राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून त्यासाठी काही पाऊले उचलली आहेत. 


व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचर्समध्ये एखाद्याला त्याच्या नावडत्या ग्रुपमधून कुणालाही न समजता बाहेर पडता येणार आहे. आपण ग्रुपमधून बाहेर पडतोय याची माहिती प्रत्येकाला न समजता केवळ अॅडमिनला समजणार आहे. या महिन्यापासून व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर सुरू होणार आहे. 


व्हॉट्सअॅपवर आपण ऑनलाईन आहोत हे कुणी पाहावं यावरही आता नियंत्रण ठेवता येणार आहे. हे फीचरही या महिन्यामध्येच सुरू होणार आहे. 


 



सुरक्षेच्या कारणास्तवर व्हॉट्सअॅपने वन्स व्ह्यू हा मेसेजचा प्रकार सुरू केला आहे. पण त्याचे स्क्रीनशॉट काढण्यात येतात. त्यामुळे त्याची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे. हे थांबवण्यासाी व्हॉट्सअॅपने आता पावले उचलली आहेत. वन्स व्ह्यू प्रकारातल्या मेसेजचे जर कोणी स्क्रीनशॉट काढत असेल तर तेही आपल्याला समजणार आहे. 


गेल्या काही वर्षांपासून आम्ही आमच्या यूजर्सचे चॅट अधिक सुरक्षित रहावं यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय. त्यासाठी नवीन फीचर्स आणले जात आहेत. यूजर्सची प्रायव्हसी सुरक्षित रहावी यासाठी आताही प्रयत्न केले जात असून हे नवीन फीचर्स त्यासाठी मदतशीर ठरतील असं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. 


या नवीन फीचर्सची माहिती यूजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेतला जाणार असून त्याची सुरुवात ब्रिटन आणि भारतापासून करण्यात येणार असल्याचं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: