iPhone 14 Launch Date : संपूर्ण जग आयफोन 14 सीरिजच्या लॉंचची वाट पाहत आहे, परंतु यावर्षी Apple iPhone 14 ची प्रतीक्षा आणखी लांबणार असल्याचे दिसते. मीडीया रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की, या वर्षी iPhone 14 सीरीज लाँच होण्यास विलंब होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. iPhone 14 लाँच होण्यास उशीर होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे चीन आणि तैवानमधील वाढता राजकीय तणाव सांगितला जात आहे. अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी नुकत्याच तैवानला भेट दिल्यानंतर चीन आणि तैवानमध्ये तणाव वाढला आहे. आता प्रश्न पडतो की आयफोनचा या सगळ्याशी काय संबंध? तर जाणून घ्या
Apple कंपनीचा तैवानशी संबंध
रिपोर्टनुसार, Apple ही कंपनी Taiwan Semiconductor Manufacturing Company Limited च्या प्रमुख ग्राहकांपैकी एक आहे. ही कंपनी आयफोनमध्ये बसवलेली चिप चीनमध्ये पुरवते. येथे आयफोन पूर्णपणे एकत्रित आणि तयार आहे. अशा परिस्थितीत चीन आणि तैवानमधील वाढता तणाव पाहता चीन आयफोनमध्ये वापरलेले हार्डवेअर पार्ट्सही तैवानला परत पाठवू शकतो, असे सांगण्यात येत आहे. यामुळे आयफोन 14 चे उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्याचे लॉन्च होण्यास विलंब होऊ शकतो.
Apple iPhone 14 कधी लाँच होणार होता?
Apple iPhone 14 सीरीज सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लॉन्च होईल असे वाटत होते. मागील मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की, ही कंपनी 13 सप्टेंबर रोजी नवीन आयफोन 14 सीरीज लॉन्च करण्याची योजना आखत आहे.
भारतातही होणार उत्पादन
रिपोर्टनुसार Apple चीनच्या बाहेरही पर्याय शोधत आहे. Apple ने भारतात iPhone 14 बनवण्यासाठी फॉक्सकॉन कंपनीसोबत भागीदारी केली आहे. तथापि, कंपनी भारतात फक्त 6.1-इंच स्क्रीनसह iPhone 14 चे उत्पादन करेल. या कारणास्तव, Apple चीनसह भारतात आयफोन तयार करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
महत्वाच्या बातम्या :
- Twitter : ट्विटरच्या सुरक्षेला सुरंग! 54 लाख युजर्सचा डेटा लीक, अकाऊंट होल्डर्सला दिली माहिती
- Watch : Apple Watch सारखे हुबेहूब दिसणारे Bluei TORSO भारतात लॉन्च; किंमत 3 हजारांहूनही कमी
- 5G spectrum : अखेर 5G स्पेक्ट्रमचा लिलाव यशस्वी, केंद्र सरकारला 1.5 लाख कोटी रुपयांचा फायदा