Tata Neu : Tata Neu हे टाटा समूहाचे सुपर अ‍ॅप 7 एप्रिल रोजी लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. अ‍ॅपच्या गुगल प्ले स्टोअर पेजवर एका टीझर फोटोद्वारे कंपनीने ही घोषणा केली आहे. याने प्रथम इंडियन प्रीमियर लीग टूर्नामेंटबरोबर सुपर अ‍ॅपची सार्वजनिकरित्या जाहिरात करण्यास सुरुवात केली. सध्या हे अ‍ॅप फक्त टाटा ग्रुपचे कर्मचारी वापरू शकतात. 7 एप्रिल रोजी लॉन्च झाल्यानंतर ते अ‍ॅप सर्वांसाठी उपलब्ध होईल.


टाटा न्यू (Tata Neu) म्हणजे काय ?


Tata Neu हे समूहाचे सुपर अ‍ॅप आहे जे त्याच्या सर्व डिजिटल सेवा आणि अ‍ॅप्स एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणते. त्याचा प्ले स्टोअर पेजवर अ‍ॅपच्या तपशीलांमध्ये उल्लेख आहे. अत्याधुनिक डिजीटल माध्यमात ज्या काही सेवांची गरज असते ती या माध्यमातून पूर्ण होणार आहे.    


Tata Neu वर 'या' सेवा उपलब्ध असतील


टाटा ग्रुपच्या विविध डिजिटल सेवा जसे की AirAsia India, Air India किंवा Taj Group च्या हॉटेल्सवर फ्लाईट्सची तिकिटे बुक करणे, Bigbasket वरून किराणा सामान मागविणे, 1mg वरून औषधे, किंवा Croma मधून इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करणे आणि Westside वरून कपडे खरेदी करणे. Tata Niue अ‍ॅपद्वारे शक्य होणार आहे. अ‍ॅपवरून खरेदी करणाऱ्यांना कंपनी नवीन कॉईन देईल, जी या अ‍ॅपवर रिडीम केली जाऊ शकतात.


भारतात आणखी सुपर अ‍ॅप्स आहेत का ?


Amazon, Paytm, Reliance Jio सारख्या इतर अनेक इंटरनेट गटांनी सुपर अ‍ॅप्सच्या त्यांच्या स्वत:चे व्हर्जन तयार केले आहेत. जिथे त्यांना पेमेंट, कंटेंट स्ट्रीमिंग, शॉपिंग, ट्रॅव्हल बुकिंग, किराणा सामान इत्यादी सेवांचा एक पॅक मिळू शकतो.


भारतीय कंपन्यांना सुपर अ‍ॅप्स का बनवायचे आहेत ?


एखादा देश सुपर अ‍ॅप तयार करतो जेव्हा त्याच्या लोकसंख्येचा मोठा भाग डेस्कटॉपऐवजी स्मार्टफोनवरून काम करू इच्छितो आणि स्थानिक गरजांसाठी कस्टमाईज्ड अ‍ॅप्सची इकोसिस्टम विकसित केली जात नाही. भारताच्या लोकसंख्येनुसार इथे डिजीटल माध्यमांचा वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. भारतीय कंपन्या सुपर अ‍ॅप्स तयार करण्याच्या विचारात असण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha