Elon Musk: ट्वीटर या सोशल नेटवर्किंग (मायक्रोब्लॉगिंग) साईटचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 9 टक्के शेअर खरेदी केल्यानंतर एलन मस्कला ट्वीटरने संचालक मंडळात स्थान दिलं आहे. ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. आज सकाळी एलन मस्क यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन ट्वीटमध्ये एडिट पर्याय हवा की नको, असा प्रश्न विचारुन ट्वीपल्सची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. एलन मस्क यांच्या या पोलला उत्तर देताना ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्वीपल्सला सल्ला दिला होता की, एलन मस्क यांनी विचारलेला प्रश्न खूप महत्वाचा आहे, आपलं उत्तर काळजीपूर्वक निवडा. त्यांच्या या ट्वीटलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.. त्यानंतर आता त्यांनी एलन मस्क यांना ट्वीटरच्या संचालक मंडळात घेत असल्याचं ट्वीटरवरुनच जाहीर केलंय.
आपल्या ट्वीटमध्ये काय म्हणाले पराग अग्रवाल?
या संबंधित माहिती देताना पराग अग्रवाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, एलन मस्क यांच्याशी अलीकडच्या काळात झालेल्या चर्चा आणि विचार विनिमयानंतर, त्यांच्या ट्वीटरच्या संचालक मंडळावर येण्यामुळे ट्वीटरला खूप फायदा होईल, ट्वीटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचं मूल्यवर्धन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ट्वीटर या मायक्रोब्लॉगिंग सेवेचे ते टीकाकार तर आहेतच शिवाय त्यांचा मायक्रोब्लॉगिंग प्रक्रियेवर गाढा विश्वास आहे. ट्वीटरमध्ये आम्हाला नेमक्या अशाच व्यक्तिमत्वाची गरज आहे, असंही पराग अग्रवाल यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय. एलन मस्कचं स्वागत करताना अग्रवाल यांनी मस्क यांच्या ट्वीटरमध्ये येण्याने ट्वीटर अधिक मजबूत झाल्याची भावना व्यक्त केलीय.
संबंधित बातम्या: