Twitter Edit Button : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने (Elon Musk) मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये (Twitter) मोठी गुंतवणूक केल्यानंतर ट्विटरमध्ये बदल करण्याची सुरुवात केल्याचं दिसून येतंय. नुकतीच एलन मस्क यांनी ट्विटरचे 9.2 टक्के शेअर्स विकत घेतले आहेत. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर पोल घेत युजर्सला प्रश्न विचारला आहे. एलन मस्क यांनी ट्विटर युजर्सला एडिट फिचर हवंय का याबाबत पोल घेत विचारणा केली आहे. या पोलमध्ये अवघ्या सहा तासांमध्ये 21 लाख 78 हजार 414 हून अधिक वोट मिळाले आहेत.


काय आहे एलन मस्कचं ट्विट आणि एडिट फिचर?
ट्विटरने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं आहे. लवकरच ट्विटर आपल्या प्लॅटफॉर्मवर ट्विटमध्ये बदल करण्यासाठी एडिट फीचर (Edit Feature) आणू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. युजर्स या फीचरची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. आता एलन मस्क यांनी याबाबत एक पोल ट्विट केला आहे. त्यांनी लोकांना विचारले आहे की, 'तुम्हाला ट्विटरवर एडिट बटण हवं आहे का?'






काय म्हणाले ट्विटरचे सीईओ?
एलन मस्क यांच्या या ट्विटला ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी रिट्विट केले आहे. पराग अग्रवाल यांनी रिट्विट करत म्हटलं आहे की, 'या पोलचे निकाल खूप महत्त्वाचे असतील, कृपया काळजीपूर्वक मतदान करा.'






 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha