Voter ID Card Download In Smartphone : सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. प्रचाराला वेग आला असतानाच निवडणूक आयोगाने मतदारांसाठी खास सुविधा आणली आहे. E-EPIC या पोर्टलच्या माध्यमातून आता पाच राज्यातील मतदार आपलं वोटर आयडी अगदी सहजपणे डाऊनलोड करू शकतात. जाणून घ्या याची प्रक्रिया नेमकी कशी आहे.
e-EPIC ही EPIC ची सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF) फाईल आहे. जी मोबाईलवर किंवा संगणकावर सेल्फ प्रिंट च्या माध्यमातून डाऊनलोड केली जाऊ शकते. अशा प्रकारे मतदार आपल्या मोबाईलमध्ये कार्ड स्टोर करू शकतात.
तुम्ही वोटर पोर्टल किंवा व्होटर हेल्पलाईन मोबाईल अॅप च्या माध्यमातून e-EPIC डाऊनलोड करू शकता.
यासाठी मतदार पोर्टलवर लॉगिन करा.
अशा प्रकारे डाऊनलोड करा :
- जर तुम्ही पहिल्यांदाच ही प्रक्रिया करत असाल तर आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकाल.
- मेन्यू नेव्हिगेशन मधून डाऊनलोड e-EPIC वर जा .
- आता तुम्हाला EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक टाकावा लागेल.
- आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पडताळणीसाठी एक मेसेज येईल.
- OTP सबमिट केल्यानंतर, तुम्ही तुमचा e-EPIC डाऊनलोड करू शकाल.
मोबाईल नंबरची नोंदणी कशी कराल ?
- सर्वात आधी e-KYC वर क्लिक करा आणि KYC पूर्ण करा.
- आता KYC पूर्ण करण्यासाठी मोबाईल नंबर अपडेट करा.
- आता तुम्ही तुमचा e-EPIC डाऊनलोड करू शकाल.
महत्वाच्या बातम्या :
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
- Budget 2022 : यंदा येणार 5G , अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
- मारुती सेलेरियो आणि वॅगनआर मध्ये जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या कोणती कार आहे दमदार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha