Union Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या दुसऱ्या डिजिटल बजेटमध्ये डिजिटल क्षेत्राला खूप महत्व दिले आहे. 2022 च्या बजेटमध्ये त्यांनी मोबाईल फोन, मोबाईल चार्जर, ट्रान्सफॉर्मर, कॅमेरा लेन्ससह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे या वस्तू स्वस्त होणार आहेत. भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन जास्तीत जास्त वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. जाणून घेऊयात कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात.


किंमत कशी कमी होईल


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात मोबाईल फोन कॅमेरा लेन्स, ट्रान्सफॉर्मर आणि मोबाईल फोन चार्जरसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि त्यांच्या पार्ट्सवर सूट देण्याची घोषणा केली आहे. यावरील शुल्क सवलतीमुळे भारतात मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीला वेग येणार आहे. म्हणजेच ते बनवण्यासाठी अधिकाधिक कंपन्या पुढे येतील. जर ते बनवण्याचा खर्च कमी असेल तर खर्च देखील कमी होईल. म्हणजेच लोकांना आता मोबाईल, फोन चार्जर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात मिळणार आहेत. याशिवाय, सरकारने देशात ऑडिओ उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स स्मार्ट मीटरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कस्टम ड्युटी कमी करण्याचेही सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे. 


गेल्या वर्षीची वाढ


गेल्या वर्षी निर्मला सीतारमण यांनी 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा त्यात मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कस्टम ड्युटी 2.5% ने वाढवली होती. त्यामुळे परदेशातून येणारे मोबाईल आणि त्यांचे पार्ट्स देशात येताना महाग व्हायचे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha