Instagram and Facebook New Feature : इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुकवर (Facebook) वापरकर्त्यांसाठी खुशखबर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता यूजर्स इंस्टाग्राम स्टोरी (Instagram Story) आणि डायरेक्ट मेसेजमध्ये ()Direct Message) 3थ्रीडी अवतार (3D Character) पाठवू शकतात. सध्या हे फीचर फक्त अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोसाठी लाँच करण्यात आले असले तरी लवकरच ते सर्व यूजर्ससाठी लाँच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) मध्येही असाच बदल करण्यात आला आहे. या नवीन फीचरमध्ये काय आहे ते जाणून घेऊया.
इंस्टाग्रामवर नवे फिचर
कंपनीच्या या फीचर अंतर्गत इंस्टाग्रामवर तुमची स्टोरी पोस्ट करताना तुम्ही 3D ग्राफिक्स वापरू शकता. यामध्ये अनेक कॅरेक्टरचे थ्रीडी अवतार समाविष्ट करण्यात आले आहेत. कॅरेक्टरशिवाय इतर गोष्टींनाही थ्रीडी लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
फेसबुकवरही येणार नवे फिचर
फेसबुक मेसेंजरमध्येही लवकरच तुम्हांला हे फीचर मिळणार आहे. फेसबुकवर तुम्हाला अनेक 3D स्टिकर्स मिळतील. मेटा (Meta) कंपनी भविष्यातील मेटाव्हर्स प्रोजेक्ट (Metaverse) लक्षात घेऊन अॅपमध्ये अपग्रेड आणि बदल करण्यावर अधिक भर देत आहे. आगामी काळातही मेटाकडून नवीन फिचर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
आणखी अनेक फिचर्सवर सुरु आहे काम
रिपोर्टनुसार, मेटा कंपनी इंस्टाग्रामसाठी आणखी अनेक फीचर्सवर काम करत आहे. यामध्ये, नवीन स्टिकर्स (Stickers) आणि इमोजी (Emoji), इंस्टाग्राम रीलसाठी टेम्पलेट (Instagram Reels Template), 24 तासांसाठी स्टेटस (Status) आणि NFT या सारख्या फिचर्सचा समावेश आहे. सध्या या नव्या फिचर्सची चाचणी सुरू आहे
संबंधित बातम्या :
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
- Budget 2022 : यंदा येणार 5G , अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
- मारुती सेलेरियो आणि वॅगनआर मध्ये जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या कोणती कार आहे दमदार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha