मुंबई : तुम्हाला व्हिव्होचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही चांगली संधी आहे. अमेझॉनवर विंटर कार्निव्हल सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये Vivo V7+, Vivo V5s, Vivo V5 Plus, Vivo Y69, Vivo Y66, Vivo Y53 आणि Vivo Y55s या स्मार्टफोनवर सूट देण्यात आली आहे.
विंटर सेल आजपासून (बुधवार) शुक्रवारपर्यंत चालणार आहे. 3 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरही देण्यात आली आहे. तर अमेझॉन पे बॅलन्स म्हणून 5 टक्के कॅशबॅक मिळेल. एक्स्चेंज ऑफरसह फोन खरेदी केल्यास 2 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. V7+ सोबत बारा महिन्यांसाठी रिप्लेसमेंट गॅरंटी देण्यात आली आहे.
कंपनीने काही दिवसांपूर्वीच V7+ नव्या रंगामध्ये लाँच केला होता. या फोनची किंमत 21 हजार 990 रुपये आहे. अमेझॉनवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.
V5 प्लसची किंमत 19 हजार 990 रुपये आहे. मात्र हा फोन 17 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Y69 14 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तर Y66 13 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Y53 9 हजार 990 रुपये आणि Y55S 11 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.