ओप्पो F3 कंपनीने मार्च महिन्यात लाँच केला होता. त्यानंतर आता या फोनचं 6GB रॅम व्हर्जन लाँच करण्यात आलं. ज्याची किंमत 22 हजार 990 रुपये आहे. ड्युअल फ्रंट फेसिंग कॅमेरा या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. या फोनमध्ये 16 मेगापिक्सेल आणि 8 मेगापिक्सेल सेंसर देण्यात आला आहे.
हा फोन खरेदी करताना ग्राहकांना 3 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर मिळणार आहे. शिवाय तीन महिन्यांसाठी हॉटस्टारचं मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. एचडीएफसी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरुन फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल.
फीचर्स :
- 6 इंच आकाराची स्क्रीन
- 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16 आणि 8 मेगापिक्सेल ड्युअल फ्रंट कॅमेरा
- 6GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज
- 4000 mAh क्षमतेची बॅटरी
- क्वालकॉम Snapdragon 653 प्रोसेसर
- फास्ट चार्जिंग