चीनची प्रसिद्ध कंपनी अलीबाबा ग्रुपचं हे अॅप आहे. या अॅपचं मिनी व्हर्जन अजून प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप का हटवण्यात आलं, याबाबत अद्याप गुगल किंवा अलीबाबा कंपनीने काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
याबाबत यूसी ब्राऊजरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने माहिती दिली आहे. ब्राऊजर 30 दिवसांसाठी हटवण्यात आलं आहे. चुकीच्या पद्धतीने प्रमोशन करुन डाऊनलोड वाढवल्यामुळे गुगलने ही कारवाई केली, अशी माहिती या कर्मचाऱ्याने दिली आहे.
दरम्यान भारतीय ग्राहकांचा डेटा चीनच्या सर्व्हरला विकल्याचा आरोपही यूसी ब्राऊजरवर लावण्यात आला होता. यावर्षी ऑगस्टमध्ये सरकारने या ब्राऊजरची चौकशीही सुरु केली होती.