Vi 4G Data Voucher : टेलिकॉम कंपनी Vi ग्राहकांसाठी खास डेटा व्हाऊचर घेऊन आली आहे. यामध्ये ग्राहकांना सर्वात स्वस्त दरात डेटा उपलब्ध होईल. या पॅकची किंमत 100 रुपयांपर्यंत असून 19 रुपयांपासून सुरु होते. सर्वात स्वस्त 19 रुपयांच्या व्हाउचरमध्ये तुम्हाला 1 जीबी ते 9 जीबीपर्यंत डेटा उपलब्ध असेल. येथे आम्ही तुम्हाला Vodafone Idea च्या 100 रुपयांच्या स्वस्त दरात मिळणाऱ्या 4G व्हाउचरबद्दल माहिती सांगणार आहोत. 


व्होडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर करते. ग्राहकांना अतिरिक्त डेटा हवा असल्याचं कंपनीचे स्वस्त 4G डेटा व्हाउचर (4G Data Voucher) वापरू शकतात. येथे आम्ही तुम्हाला कंपनीच्या 100 रुपयांच्या स्वस्त व्हाउचरबद्दल सांगत आहोत. त्यांची किंमत 19 रुपयांपासून सुरू होते आणि 98 रुपयांपर्यंत आहे. तसेच हे व्हाउचरवर 1 दिवस ते 28 दिवसांची वैधता मिळते.


1. Vodafone-Idea चे सर्वात स्वस्त 4G डेटा व्हाउचर 19 रुपयांचे आहे. यामध्ये ग्राहकांना 24 तासांच्या वैधतेसह फक्त 1 GB डेटा दिला जातो. वैधतेदरम्यान तुम्ही हा डेटा कधीही वापरू शकता.


2. Vodafone-Idea चे दुसरे 4G डेटा व्हाउचर 48 रुपयांचे आहे. यामध्ये ग्राहकांना 21 दिवसांसाठी एकूण 2 GB डेटा दिला जातो. वैधतेदरम्यान तुम्ही हा डेटा कधीही वापरू शकता.


3. 58 रुपयांच्या 4G डेटा व्हाउचरची खास गोष्ट म्हणजे याची वैधता सुमारे एक महिना आहे. यामध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी 3 GB डेटा दिला जातो. वैधतेदरम्यान तुम्ही हा डेटा कधीही वापरू शकता.


4. यादीतील चौथे आणि शेवटचे 4G डेटा व्हाउचर 98 रुपये किमतीचे आहे. या प्लॅनमध्ये 21 दिवसांची वैधतेसह 9 GB डेटा दिला जातो. वैधतेदरम्यान तुम्ही हा डेटा कधीही वापरू शकता.


Reliance Jio 4G डेटा व्हाउचर
रिलायन्स जिओ एकूण चार 4G डेटा व्हाउचर ऑफर करते, ज्यांची किंमत 15 रुपये, 25 रुपये, 61 रुपये आणि 121 रुपये आहे. या प्लॅनमध्ये अनुक्रमे 1 GB, 2 GB, 6 GB आणि 12 GB डेटा दिला जातो. विशेष बाब म्हणजे जिओच्या सर्व डेटा व्हाउचरची वैधता तुमच्या सक्रिय प्लॅनवर अवलंबून असते.


महत्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha