OnePlus Nord 3 : OnePlus ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Oneplus NOrd CE 2 लॉंच केला आहे. आता कंपनी आपल्या Nord सीरीजचा आणखी एक स्मार्टफोन लॉंच करणार आहे. हा स्मार्टफोन OnePlus Nord 3 असू शकतो. 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह OnePlus Nord 3 या वर्षात साधारण जुलै महिन्याच्या जवळपास लॉंच केला जाण्याची शक्यता आहे. नवीन OnePlus फोन मागच्या वर्षी जुलैमध्ये लॉंच झालेल्या OnePlus Nord 2 ची पुढील सीरिज असण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षीच्या मॉडेलमध्ये चार्ज 65 (65W) चार्जिंग टेक्नॉलॉजी होती. यामध्ये 30 मिनिटांत शून्य ते 100% पर्यंत चार्जिंगची सुविधा देण्यात आली होती.
150W फास्ट चार्जिंगची सुविधा :
या आठवड्याच्या सुरुवातीला MWC येथे, OnePlus सारख्याच असणाऱ्या Realme ने त्याचे 150W SuperVOOC चार्जिंग मानक घोषित केले. ज्याचा दावा आहे की, 15 मिनिटांत 4,500mAh बॅटरी पूर्णपणे चार्ज होईल. Realme ने स्वतःचे 150W चार्जिंग मानक देखील सादर केले ज्याला ते 150W अल्ट्राडार्ट चार्ज म्हणतात. रिपोर्टनुसार, OnePlus Nord 3 Realme GT Neo 3 वर आधारित असू शकतो. ज्याची घोषणा MWC 2022 मध्ये कंपनीच्या 150W चार्जिंग तंत्रज्ञानासह करण्यात आली होती. याशिवाय हा 5G स्मार्टफोन असेल. तसेच यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
OnePlus ने अजून OnePlus Nord 3 बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण तरीही, स्मार्टफोन कंपनीने जुलै 2020 मध्ये OnePlus Nord लाँच केल्यापासून वर्षातून एकदा नवीन Nord फ्लॅगशिप सादर करण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. OnePlus चा गेल्या दोन वर्षातील ऐतिहासिक रेकॉर्ड पाहता, OnePlus Nord 3 जुलैमध्ये मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.
रेग्युलर OnePlus Nord आणि OnePlus Nord 2 तसेच OnePlus Nord CE आणि OnePlus Nord N मॉडेल्सचा समावेश असलेल्या OnePlus Nord सीरिजने ब्रँडच्या दाव्यानुसार अलीकडेच 10 मिलियन युनिट विक्री पार केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Instagram Feature : Instagram बंद करतंय 'हे' अॅप, फायदा होणार की नुकसान जाणून घ्या...
- POCO चा बजेट स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या POCO M4 Pro चे फीचर्स आणि ऑफर्स
- Samsung Galaxy : 12 हजारांच्या डिस्काऊंटसह सॅमसंगचा 'हा' टॅबलेट आहे खास, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha