Apple Event: अॅपलने आपल्या अपकमिंग इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. हा इव्हेंट 8 मार्च रोजी होणार आहे. यामध्ये कंपनी आपले नवीन MacBook Pro, MacBook Air, Mac mini आणि iMac Pro सादर करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, अॅपल आपल्या या इव्हेंटमध्ये नवीन iPhone SE 3 देखील लॉन्च करू शकते.
नवीन डिव्हाईसचे नाव iPhone SE+5G
एका रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या SE सिरींजमधील नवीन मोबाईलचे नाव iPhone SE+5G ठेवू शकते. या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये कंपनी अनेक डिव्हाईस लॉन्च करू शकते. अॅपलने या इव्हेंटला 'पीक परफॉर्मन्स' असे नाव दिले आहे. यामध्ये परफॉर्मन्स फोकस्ड डिव्हाईस दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कुठे पाहता येईल हा इन्व्हेंट?
अॅपलचा अपकमिंग इव्हेन्ट 8 मार्च रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा इव्हेन्ट रात्री 11.30 वाजता सुरू होईल. कंपनी हा इव्हेन्ट अॅपल पार्कवरून लाइव्ह करेल. जे कंपनीच्या वेबसाइट आणि अॅपल टीव्ही अॅप्सवर थेट पाहता येईल. मात्र अॅपलने या इव्हेंटमध्ये लॉन्च होणाऱ्या डिव्हाईसबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
नवीन मॅकबुक होऊ शकतात लॉन्च
अॅपल आपल्या इव्हेंटमध्ये नवीन मॅक लाइन-अप लॉन्च करू शकते. यात नवीन MacBook Pro, MacBook Air आणि Mac Mini चा समावेश आहे. या तिन्ही मॅकबुकमध्ये नवीन M2 चिप मिळू शकते. तसेच M1 Pro Chis सह नवीन Mac Mini पाहायला मिळू शकतो. मॅकबुक एअरमध्ये अनेक मोठे बदल होऊ शकतात. यामध्ये एक नवीन डिझाइन पाहायला मिळू शकते. जी मागील वर्षी लॉन्च केलेल्या MacBook Pro सारखीच असेल. यामध्ये रंगीत डिझाइन देखील मिळू शकते. तसेच यात मिनी एलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो.