मुंबई : स्मार्टफोन बनवणारी कंपनी पोकोने (POCO) भारतात आपला आणखी एक मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करण्यात आला होता. याआधी कंपनीने POCO M4 Pro 5G व्हेरिएंट लॉन्च केला होता. लॉन्च केलेला नवीन फोन हा याच फोनचा 4G व्हेरिएंट आहे. 


Poco M4 Pro या स्मार्टफोनमध्ये 90Hz AMOLED डिस्प्ले, मीडियाटेक हीलिओ G96 चिप, 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.


Poco M4 Pro 4G च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोअरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. हा फोन 6GB रॅम + 128GB स्टोअरेज आणि 8GB रॅम + 128GB स्टोअरेजमध्येही उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 16,499 रुपये आणि 17,999 रुपये आहे. 


फोनची विक्री फ्लिपकार्टवर 7 मार्चपासून (दुपारी 12 वाजता) होईल. यादरम्यान HDFC बँक कार्डधारकांना 1,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट दिला जाईल. याशिवाय क्रेडिट कार्डद्वारे 572 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येऊ शकतो. कूल ब्लू, पोको यलो आणि पॉवर ब्लॅक या तीन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.


POCO M4 Pro 4G स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट (180Hz टच सॅम्पलिंग) आणि होल पंच कट-आऊटसह 6.43-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कॉर्निंग गोरिला ग्लास 3 स्क्रीन प्रोटेक्शनसह स्मार्टफोनची ऑल-प्लास्टिक बॉडी आहे. यामध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंतच्या रॅमसह 128 GB स्टोअरेज मिळतो.  डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी फोन IP53 सर्टिफाईड आहे. 


कॅमेऱ्याबाबत बोलायचं झाल्यास यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेल असून एक कॅमेरा 8 मेगापिक्सेल आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रण्ट कॅमेरा देण्यात आला आहे.


या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात व्हर्च्युअल मेमरी एक्स्पेंशन फीचर आणि स्टोअरेज वाढवण्याची सुविधाही देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्यूएल स्पीकर आणि साईड माऊंटेड फिंगरप्रिंट रीडर आहे.