Google Search : सध्याच्या काळात गोपनीयता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषत: इंटरनेटच्या या युगात, जेव्हा तुमची काही अत्यंत वैयक्तिक माहिती कोणीतरी ऑनलाइन उपलब्ध करून देते आणि काही मिनिटांत ती हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत सर्च इंजिन गुगलने नवीन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत, तुम्हाला Google ला स्वतःबद्दलची संवेदनशील, वैयक्तिक माहिती काढून टाकण्यास विनंती करता येऊ शकते. गुगलने एका ब्लॉगद्वारे युजर्सना याची माहिती दिली आहे. Google च्या मते, त्यांच्याकडे आधीपासूनच अनेक धोरणे आहेत, जी लोकांना google search मधून काही गोष्टी काढून टाकण्याची विनंती करू देतात, ज्या सार्वजनिक झाल्यास लोकांना थेट हानी पोहोचवू शकतात.


इंटरनेच्या माध्यमातून कधीकधी ही माहिती इतरत्र आणि अनपेक्षित ठिकाणी पोहोचते. म्हणूनच गुगलची धोरणे आणि सुरक्षितता देखील विकसित होत आहेत.  गुगलने सांगितले, “माहिती देणे हे सर्च इंजिनचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, परंतु युझर्सना त्यांच्या गोपनीय माहितीचे संरक्षण करणेही तितकेच आवश्यक आहे,” यावेळी Google ने म्हटले, तुमची संवेदनशील, वैयक्तिक ओळख नेहमी गोपनीय ठेवण्यासाठी आम्ही आमची धोरणे अपडेट करत आहोत जेणेकरून लोकांना त्यांच्या सर्चमधील ऑनलाइन उपस्थितीवर अधिक नियंत्रण ठेवता येईल. एका रिपोर्टनुसार, Google ला गोपनीय माहिती काढून टाकण्यास सांगू शकतील. बुधवारच्या नोटीफिकेशनमध्ये Google अद्यतनित धोरणांबाबत माहिती दिली आहे. यामध्ये ईमेल पत्ते, घर किंवा कार्यालयाचे पत्ते, फोन नंबर आणि इतर वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती समाविष्ट आहे. जी हटविली जाऊ शकते.


Google च्या हेल्प पेजला भेट दिली पाहिजे


याव्यतिरिक्त तुम्ही सर्च इंजिनमधून तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स काढण्याची विनंती करू शकता. हे वैयक्तिक माहितींची चोरी आणि हॅकिंगपासून संरक्षण करण्यात मदत करेल. Google वरून तुमची माहिती काढून टाकण्यासाठी, तुम्ही Google च्या हेल्प पेजला भेट दिली पाहिजे. तुम्ही भेट देऊन कोणतीही वैयक्तिक माहिती काढून टाकण्याची विनंती करू शकता, येथे तुम्हाला तुमची माहिती कुठे उपलब्ध आहे ते URL मध्ये टाकण्यास सांगितले जाईल.


Google च्या मते, विनंती प्राप्त झाल्यानंतर, याची गंभीर दखल घेत माहितीच्या उपलब्धतेवर मर्यादा घालत याची खात्री करण्यासाठी ते वेब पेज वरील सर्व माहितीचे मूल्यांकन करेल. त्यात म्हटले आहे की, ही माहिती सरकारी किंवा अधिकृत स्त्रोतांच्या वेबसाइटवरील सार्वजनिक रेकॉर्डचा भाग आहे की नाही हे देखील पाहण्यात येईल. त्यानंतर कारवाई केली जाईल. ही URL काढून टाकल्याने यापुढे गुगल सर्चमध्ये वैयक्तिक माहिती राहणार नाही. येथे हे देखील नमूद केले पाहिजे की Google सर्च इंजिन कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती दर्शविण्यापासून प्रतिबंधित करण्यास सक्षम आहे. Google च्या सर्व्हरवर अशाप्रकारे पर्याय उपलब्ध असताना. त्यामुळे, अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना प्रथम प्रदात्याकडून म्हणजे Google कडून माहिती काढून टाकण्याची विनंती करावी लागेल.",