GPS-aided GEO augmented navigation : 'गगन' (GAGAN) म्हणजेच जीपीएस (GPS) सहाय्यित GEO ऑगमेंटेड नेव्हिगेशन नावाच्या भारताच्या स्वतःच्या उपग्रहावर आधारित ऑगमेंटेशन सिस्टमद्वारे प्रथमच विमानाचे लॅंडिंग यशस्वी झालं आहे. राजस्थानमधील अजमेरजवळील छोट्या विमानतळावर या स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीमची चाचणी झाली. यामुळे भारत आता यूएस, जपान आणि युरोप या गटात सामील झाला आहे. स्वदेशी नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम 'गगन' वापरून विमान उतरवणारी 'इंडिगो' ही देशातील पहिली एअरलाइन बनली आहे. यासह भारत आशियातील पहिला देश बनला आहे ज्याकडे स्वत:ची स्वदेशी नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम आहे.


इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजस्थानमधील किशनगड विमानतळावर बुधवारी सकाळी ATR-72 विमान GPS-सहाय्यित जिओ-ऑगमेंटेड नेव्हिगेशन (GAGAN) वापरून उतरवण्यात आलं. केंद्राच्या विमानतळ प्राधिकरणाने (AAI) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी संयुक्तपणे ही नेव्हिगेशन प्रणाली विकसित केली आहे.






 


विमानाच्या लँडिंगसाठी धावपट्टीजवळ येत असताना मार्गदर्शनासाठी 'गगन' प्रणाली वापरली जाते. त्याची अचूकता विशेषतः इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) स्थापन नसलेल्या लहान विमानतळांसाठी उपयुक्त आहे. गगन भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे आधुनिकीकरण करेल, उड्डाणाला होणार विलंबही कमी करेल. यासह इंधन वाचवेल आणि उड्डाणाची सुरक्षाही सुधारेल, असे निवेदनात सांगण्यात आलं आहे.


नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 1 जुलै 2021 नंतर भारतात नोंदणीकृत सर्व विमानांना GAGAN सिस्टीम सुसज्ज करण्याचा आदेश जारी केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :