न्यूयॉर्क : जर तुम्ही एखादी वेबसाईट सातत्याने पाहात असाल, तर त्यावरील तुमची माहिती कितपत सुरक्षित आहे? हा प्रश्न अनेकांनाच असतो. पण याबाबतचा एक रिसर्च नुकताच प्रकाशित झाला आहे. यात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या 1000 वेबसाईटपैकी 10 वेबसाईट सतत हॅकर्सच्या रडारवर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन डिएगो विश्वविद्यालयाने हा शोधनिबंध सादर केला आहे. विश्वविद्यालायचे प्रध्यापक आणि रिसर्चचे वरिष्ठ लेखक एलेक्स सी स्रोरेन यांनी सांगितलं की, “सायबर हॅकर्स सर्वच क्षेत्रावर लक्ष ठेवून असतात. ते कधी कुठे कोणती वेबसाईट हॅक करतील, याबाबत काहीही सांगता येत नाही.”
संशोधकांनी सायबर हॅकिंगचं परिक्षण करण्यासाठी तयार केलेलं ट्रिप वायर नावाचं डिव्हाईस
या रिसर्च टीममधील आणखी एक लेखक जो डीबलासियो यांनी सांगितलं की, “सायबर हॅकिंगचं हे प्रमाण अतिशय कमी वाटेल. पण जगभरात लाखो वेबसाईट आहेत. याचाच अर्थ प्रत्येक वर्षात लाखो वेबसाईट हॅक होऊ शकतात.”
डीबलासियो यांनी पुढं सांगितलं की, “एखाद्या मोठ्या कंपनी किंवा फर्मचं एक टक्का स्वामित्त्व कुणाकडेही जाणं अतिशय धोक्याचं आहे.”
वेबसाईट कधी आणि कशी हॅक होते, हे पाहण्यासाठी संशोधकांनी एक डिव्हाईस तयार केलं होतं. या डिव्हाईसद्वारे हॅकिंगचं यशस्वी परिक्षण करण्यात आलं. संशोधकांनी याचं नामकरण ‘ट्रिप वायर’ असं केलं आहे.
या डिव्हाईसद्वारे तुमच्याशी संबंधित ई-मेल अकाऊंटवरील कारवायांवर लक्ष ठेवता येतं. दरम्यान, लंडनमधी एसीएम इंटरनेट मेजर्मेंट कॉन्फ्रेंसमध्ये या डिव्हाईसचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं.
सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या 1000 पैकी 10 वेबसाईट हॅकर्सच्या रडारवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Dec 2017 01:36 PM (IST)
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील डिएगो विश्वविद्यालयाने सायबर हॅकिंगसंदर्भात शोधनिबंध सादर केला आहे. यात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या 1000 वेबसाईटपैकी 10 वेबसाईट सतत हॅकर्सच्या रडारवर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -