मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ट्विटरवर ट्रोल करणाऱ्या स्तंभलेखिका शेफाली वैद्य यांची बोलती बंद केली.


अमृता फडणवीस यांनी एका एफएम चॅनेलच्या चॅरिटी शोच्या ख्रिसमस थिम प्रमोशनला हजेरी लावली. यावरुन शेफाली वैद्य यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, अमृता यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण अमृता यांनी हजरजबाबी उत्तरं देत, त्यांची एकप्रकारे बोलती बंद केली.

काय आहे वाद?

अमृता फडणवीस यांनी चॅरिटी कार्यक्रमाबाबत ट्विट केलं. त्या म्हणाल्या,

“92.7 बीग एफएमच्या अम्बेसेडर म्हणून ‘बी सँटा’ अभियानाला सुरुवात केली. लोकांकडून गिफ्ट, वस्तू जमा करुन, त्या गरीब मुलांना वाटण्यात येतील, जेणेकरुन या ख्रिसमसला त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेलं. तुमच्या जवळच्या गिफ्ट बॉक्समध्ये तुमच्या भेटवस्तू जमा करा, आणि या दानातून तुमचा आनंद द्विगुणित करा”



याशिवाय दुसऱ्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या, "प्रेम, दान आणि  सद्भावनेला कोणताही धर्म नसतो. सर्व सकारात्मक स्वीकारु आणि नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू"

यावर शेफाली वैद्य यांनी ट्विट करुन अमृता यांना काही सवाल विचारले.

"पण ख्रिश्चन हा धर्म आहे ना? तुम्ही धर्मप्रसारकांना धर्मपरिवर्तनाचं काम थांबवायला सांगा, त्यानंतर मी तुमच्या प्रेम आणि सकारात्मक दान मोहिमेत सहभागी होईन", असं ट्विट शेफाली वैद्य यांनी केलं.

इतकंच नाही तर शेफाली वैद्य यांनी एकामागे एक ट्विटची मालिकाच सुरु केली.

पती देवेंद्र फडणवीस ख्रिसमस प्रार्थना करतात, पत्नी बी सँटा अभियान सुरु करते. असो!  महाराष्ट्रात ख्रिश्चन धर्मप्रसार सोपा आहे, असं शेफाली वैद्य म्हणाल्या.

याशिवाय पुढे त्या म्हणतात, "प्रिय अमृता फडणवीस, तुमच्या सोशल मीडिया टीमला तुमच्या ट्विटखालील रिप्लाय वाचण्यास सांगा.  'चिकन सूप फॉर द इव्हँजेलिकल सोल'च्या लेखकाप्रमाणे न वागता, तुमच्या पतीला निवडून दिलेल्या जनतेचा आदर करा.

या ट्विटनंतर मात्र अमृता फडणवीस यांनी मौन सोडलं आणि शेफाली वैद्य यांना उत्तर दिलं

मी हिंदू आहे, त्याचा मला इतरांप्रमाणे अभिमानही आहे. मी माझ्या देशात प्रत्येक सण साजरा करते. तसं प्रत्येक सण साजरा करावा की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आमच्या देशाच्या खऱ्याखुऱ्या प्रेम भावनेचं प्रतिनिधित्व करतो. यामुळे देश, धर्म आणि मानवतेला बाधा येत नाही.

अमृता फडणवीस यांच्या या ट्विटवरही शेफाली वैद्य यांनी आक्षेप घेतला.

त्या म्हणाल्या, "खासगी आयुष्यात तुम्ही व्यक्तिगतरित्या काहीही करु शकता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणजेच महाराष्ट्राची पहिली महिला म्हणून, तुमच्या प्रत्येक कृतीवर लोकांचं लक्ष असणारच, त्यावर मतप्रदर्शन, टीका होणारच. मात्र तुम्ही वर म्हटल्याप्रणाणे, 'आम्ही' म्हणजे तुम्हाला नेमकं कोण म्हणायचं आहे?

यानंतर शेफाली वैद्य यांनी अमृता फडणवीस यांना गुजरातमधील एका चर्चच्या धर्मगुरुच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. गुजरातमध्ये भाजपसारख्या 'राष्ट्रवादी' पक्षाला मतदान करु नका, असं ते म्हणाले होते, याची तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या या वक्तव्याचा तुम्हाला अभिमान आहे का"

https://twitter.com/fadnavis_amruta/status/940412986849558528

https://twitter.com/ShefVaidya/status/940452124483141632

https://twitter.com/ShefVaidya/status/940434753316012032

https://twitter.com/ShefVaidya/status/940464132679131137

https://twitter.com/fadnavis_amruta/status/940512015709118464

https://twitter.com/ShefVaidya/status/940526548938932224

https://twitter.com/ShefVaidya/status/940574314289512448