Tata Electric Car: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सला भारतीय इलेक्ट्रिक कारच्या बाजारात आपली पूर्ण पकड निर्माण करायची आहे. यासाठीच कंपनीने आपल्या Nexon च्या यशानंतर भारतात आणखी नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची पूर्ण तयारी केली आहे. पुढील पाच वर्षात कंपनी 10 इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात सादर करणार असल्याचं टाटा मोटर्सने सांगितलं आहे. यामध्ये नवीन ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित कार तसेच पेट्रोल किंवा डिझेल प्रकाराशिवाय नवीन इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. कंपनीने आपल्या सर्व इलेक्ट्रिक कारमध्ये अधिक दमदार बॅटरी देऊ शकते. या बॅटरीला सुपर फास्ट चार्जिंग स्पोर्टही मिळू शकतो.
इलेक्ट्रिक वाहनांना सामान्यतः मोठ्या बॅटरी पॅकसह कारमध्ये आतील भागात अधिक स्पेस असणे आवश्यक असते. त्यामुळे हा नवीन प्लॅटफॉर्म ईव्ही बेस आहे. सध्याच्या नेक्सन किंवा टिगोरच्या तुलनेत यामध्ये मोठा बॅटरी पॅक, अधिक जागा आणि EV संबंधित फीचर्स मिळणार आहेत. टाटा मोटर्स त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणावर आधारित त्यांच्या भविष्यातील कारच्या संकल्पना किंवा उत्पादनासाठी तयार आवृत्त्या प्रदर्शित करणार असल्याची अफवा आहे. यामध्ये टाटा अल्ट्रोझच्या EV आवृत्तीसह नवीन अपेक्षित लाँग रेंज टाटा Nexon देखील पाहायला मिळणार, असं सांगण्यात येत आहे. टाटाने आपल्या मागील ऑटो एक्स्पोमध्ये Altroz EV सादर केली होती. टाटाच्या आगामी ऑटो एक्सोमध्ये कंपनी आपली नवीन 'सिएरा' कारही सादर करू शकते, अशी चर्चा आहे.
TaTa Sierra Ev ही कंपनीची नेक्स्ट जनरेशन कार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कार भारतात कंपनी कधी लॉन्च करणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. असं असलं तरी टाटा या वर्षाच्या शेवटी आपली नवीन Altroz EV लॉन्च करू शकते. कंपनीचे हे नवीन उत्पादन बाजारात आल्यानंतर महिंद्रा, एमजी, ह्युंदाई आणि मारुतीला तगडी टक्कर मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MG ZS EV : इलेक्ट्रिक कार MG ZS EV चे नवीन व्हर्जन नेमके कसे आहे? वाचा संपूर्ण रिव्ह्यू
- Electric Cars : 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
- कशी आहे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा इलेक्ट्रिक? इंडियात होणार का लॉन्च, जाणून घ्या...
Car loan Information:
Calculate Car Loan EMI