द वर्जने एका रिपोर्टमध्ये ट्विटरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीबाबत सांगितले आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, 'युजर्सना उत्तम सेवा देण्यावर आमचा भर आहे. त्यानुसार, जे युजर्स अॅक्टिव्ह नाहीत त्यांचे अकाउंट्स बंद करण्यावर काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्सना अचूक विश्वासार्ह्य माहिती मिळेल आणि ट्विटरवरील त्यांचा विश्वास वाढेल. अनेक लोकांनी ट्विटरचा वापर करावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने ट्विटरकडून हे प्रयत्न करण्यात येत आहेत.'
ट्विटरने इनअॅक्टिवेट अकाउंट कधी बंद करणार याची तारिख अद्याप जाहिर केलेली नाही. अकाउंट्स बंद करण्याची प्रक्रिया एका दिवसांत नाहीतर काही महिन्यात ट्विटर पूर्ण करणार आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस साईन इन न केलेले अकाउटं असणाऱ्यांना ट्विटर एक मेल पाठवणार आहे. जर तरिही त्यांनी अकाउंट्स साईन इन केलं नाही तर ट्विटर ते अकाउंट्स बंद करणार आहे.
संबंधित बातम्या :
गुगल मॅपचं नवं फिचर; फिरताना 'लोकल गाइड' करणार मदत
व्हॉट्सअॅपच्या नको असलेल्या ग्रुपपासून सुटका हवी?; 'या' सेटिंग्स करा
आता गुगल योग्य उच्चार करायला शिकवणार; जाणून घ्या खास फिचर