सध्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टिकटॉकचा जमाना आहे. पटापट मिळणारे लाईक्स, पोस्ट शेअर करता येणं, वाचक-प्रेक्षकांचा मिळणारा इन्स्टंट प्रतिसाद यामुळे या माध्यमांना लोकप्रियताही मिळत आहे. मात्र, ब्लॉगचं एखाद्या पुस्तक किंवा डायरीसारखं स्वरूप हे ब्लॉगला एक खाजगी अनुभव बनवतं. जणू ते तुम्ही लिहिलेलं पुस्तकंच असतं! 'ब्लॉग माझा' स्पर्धा म्हणजे हे माध्यम अधिकाधिक लोकांनी वापरावं, व्यक्त व्हावं आणि मुख्य म्हणजे लिहितं व्हावं यासाठीचा प्रयत्न आहे. मान्यवर परिक्षकांकडून आम्ही हे ब्लॉग्ज तपासून घेतो हे विशेष. आजपर्यंत 'ब्लॉग माझा' स्पर्धेतून पुढे आलेल्या अनेक ब्लॉगर्सनी आज समाजमाध्यमांमध्ये नाव कमावलं आहे. 'ब्लॉग माझा २०१९' तीच संधी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
'ब्लॉग माझा २०१९' स्पर्धेचं स्वरूप, नियम, ब्लॉग पाठवण्याची मुदत आणि बक्षीसं यांचा तपशील या लिंकमध्ये तुम्हाला मिळेल. स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर मिळत असलेला प्रतिसाद पाहून ब्लॉग पाठवण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. स्पर्धक आता आपले ब्लॉग 5 डिसेंबरपर्यंत पाठवू शकणार आहेत.
ब्लॉग माझा : मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत ‘ब्लॉग माझा 2019’ स्पर्धा, प्रवेशिका पाठवण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ