मुंबई : गुगलचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म गुगल मॅप आपल्या युजर्ससाठी आणखी एक नवं फिचर घेऊन आलं आहे. या फिचरमार्फत आता गुगल मॅपवर कोणत्याही लोकल गाइडचं प्रोफाइल फॉलो करण्यात येणार आहे. लोकल गाइडला फॉलो करण्यासाठी त्यांच्या प्रोफाइलवर फॉलोचं ऑप्शन मिळणार आहे. ज्यावर क्लिक करून तुम्ही त्यांचे फॉलोअर बनून माहिती घेऊ शकता.


World Television Day : का आणि कधीपासून साजरा केला जातो 'वर्ल्ड टेलिविजन डे'?

गुगल मॅपचं हे नवं फिचर सोशल मीडिया सारखंच आहे. ज्यावर तुम्ही आपल्या आवडीच्या लोकांना फॉलो करू शकता. गुगलच्या या फिचरवरून असा अंदाज लावला जात आहे की, गुगल मॅप आता पूर्णपणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होण्याच्या मार्गावर आहे. नवीन फिचर लोकांना कितपत आवडेल हे काही दिवसांत समजेलच. सोशल मीडिया क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्यासाठी गुगल फार आधीपासूनच प्रयत्न करत आहे. गुगलने गुगल प्लस या अॅपद्वारे याआधीही युजर्ससाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता.

आता गुगल योग्य उच्चार करायला शिकवणार; जाणून घ्या खास फिचर

सध्या हे फिचर फक्त टेस्टिंगसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. गुगल मॅपचं हे फिचर जगभरातील 9 शहरांमधील युजर्सना टेस्टिंगसाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यामध्ये दिल्ली, लंडन, न्यू-यॉर्क सिटी, मॅक्सिको सिटी, बँकॉक, टोक्यो, ओसाका, सॅन फ्रान्सिस्को आणि साओ पाओलो या शहरांचा समावेश आहे. गुगल मॅपच्या या फिचरचा पर्यटकांना फायदा होणार असून एखाद्या शहरात फिरताना ते लोकल गाइडची मदत घेऊ शकतात.