मुंबई : सध्या व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटकचं झालं आहे. पण अनेकदा हेच व्हॉट्सअॅप डोक्याला ताप होतो. व्हॉट्स अॅपवर अनेक ग्रुपमध्ये आपण असतो, अनेकदा हे ग्रुप कामाचे असतात किंवा आपल्या ओळखीची एखादी व्यक्ती आपल्याला या ग्रुपमध्ये अॅड करते. अशा अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपने आपण त्रस्त असतो. तुम्हीही अशाच नको असेलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सनी त्रासलेले असाल तर व्हॉट्स अॅप तुमच्यासाठी एक नवं फिचर घेऊन आलं आहे. ज्यामुळे यूजर्सना आता नको असलेल्या ग्रुप्सपासून सुटका करून घेणं सोप होणार आहे.


व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरमुळे यूजर्सना खास पर्याय मिळणार आहे. या फिचर अंतर्गत यूजर्स ठरवू शकणार आहेत की, त्यांना कोणती व्यक्ती व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करू शकणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरचा वापर करून यूजर मीम्स आणि मेसेजेसपासूनही स्वतःची सुटका करून घेणार आहेत.

आता गुगल योग्य उच्चार करायला शिकवणार; जाणून घ्या खास फिचर

नवीन फिचर यूजर्सना प्रायव्हसी सेटिंगमध्ये देण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही जर एखादा कॉन्टक्ट नंबर ग्रुपमध्ये अॅड करण्यापासून रोखलं असेल आणि त्या यूजरला तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करायचं असेल तर तो यूजर पर्सनल चॅटद्वारे इनव्हाइट लिंक पाठवू शकतो. या लिंकच्या माध्यमातून व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये जोडण्यासाठी यूजरला तीन दिवसांचा वेळ असेल. यादरम्यान, जर यूजरने काहीही रिअॅक्ट केलं नाहीतर त्या लिंकची व्हॅलिडीटी एक्सपायर होते.

असा करा या फिचरचा वापर :

  • व्हॉट्सअॅपच्या राइट कॉर्नरमध्ये असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

  • सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा.

  • प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करा.

  • त्यानंतर तीन ऑप्शन्स दिसतील

  • यामध्ये एव्हरीवन, माय कॉन्टॅक्ट्स आणि माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्ट चा ऑप्शन मिळेल.

  • माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्ट वर सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेले कॉन्टॅक्ट नंबर सिलेक्ट करा.


दरम्यान, व्हॉट्सअॅप नेहमीच यूजर्ससाठी नवनवीन फिचर घेऊन येत असतं. सध्या नवीन फिचर्सनुसार यूजर्सना नवीन इमोजी मिळणार आहेत. याव्यतिरिक्त व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच डार्क मोड आणि फिंगरप्रिंट सपोर्टही मिळणार आहे.