Twitter Account Block : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आयटी मंत्रालयाच्या (IT Ministry) सूचनेनुसार यावर्षी जूनपर्यंत 1,122 URL ब्लॉक केले आहेत. ही माहिती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrashekhar) यांनी बुधवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.


आयटी अधिनियम, 2000 चे कलम 69A


माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा, 2000 चे कलम 69A इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा, मित्रत्वाच्या हितासाठी कोणत्याही संगणकातील माहिती ब्लॉक करण्याचा अधिकार देते. ब्लॉकिंगची ही कारवाई आयटी अधिनियम, 2000 च्या कलम 69A च्या तरतुदीनुसार सोशल मीडियाची साइट सुरक्षित आहे का? याची खात्री करण्यात येते. ब्लॉक केलेल्या URL ची संख्या 2018 मध्ये 225, 2019 मध्ये 1,041 आणि 2021 मध्ये 2,851 होती.


ट्विटर युजर्सचा डेटा लीक


अलीकडेच ट्विटर युजर्सचा डेटा लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. ट्विटरचे सुमारे 5.4 दशलक्ष युझर्सचा वैयक्तिक डेटा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. री-स्टोअर प्रायव्हसीच्या अहवालानुसार, या वर्षी 2022 मध्ये यूजर्सचा डेटा हॅक झाला होता. माहितीसाठी, हा डेटा लीक त्याच बगमुळे झाला होता, ज्यासाठी ट्विटरने बग बाउंटी प्रोग्राम अंतर्गत झिरिनोव्स्की नावाच्या हॅकरला $ 5,040 (जवळपास 4,02,000 रुपये) दिले होते.


WhatsApp कडूनही बंदी


वापरकर्त्याच्या तक्रारींमुळे टेक जायंट WhatsApp ने 62,673 कंटेंट देखील काढून टाकला आहे. शुक्रवारी, META-मालकीच्या WhatsApp ने देखील जाहीर केले की, त्यांनी नवीन IT नियम 2021 चे पालन करून मे महिन्यात भारतातील 1.9 दशलक्षाहून अधिक अशा खात्यांवर बंदी घातली आहे.


46,000 हून अधिक खात्यांवर बंदी


ट्विटरने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल मे महिन्यात भारतीय वापरकर्त्यांच्या 46,000 हून अधिक खात्यांवर बंदी घातली होती, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने रविवारी त्यांच्या मंथली कंपाइलेंस रिपोर्ट (monthly compliance report) मध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार ट्विटरने बाल लैंगिक शोषण, नॉन-कन्सेनच्युअल न्यूडिटी आणि इतर अशाच प्रकारच्या कंटेटसासाठी 43,656 खात्यांवर बंदी घातली आहे, तर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याबद्दल 2,870 खाती बॅन केली आहेत.