iPhone 14 : अॅपल कंपनीच्या आयफोन 14   (iPhone 14) सीरीज लाँच होण्याची वाट अनेक जण उत्सुकतेने बघत आहेत. या सीरिजमध्ये  iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max हे मोबईल लाँच करण्याच्या तयारीत अॅपल कंपनी आहे. आयफोन 13 या सीरिजला देखील ग्राहकांची पसंती मिळाली. आयफोन 14 ही सीरिज कधी लाँच होणार आहे? या फोनमध्ये कोणते नवे फिचर्स असणार आहेत? या सीरिजमधील मोबाईलची किंमत किती असेल? असे प्रश्न काही लोकांना पडले आहेत. जाणून घेऊयात आयफोन सीरिजच्या लाँच डेटबाबत....


लाँच डेट आणि फिचर्स
आयफोन 14 ही सीरिज 14 सप्टेंबर रोजी लाँच केली जाऊ शकते. बीआरजी इंडियाच्या रिपोर्टनुसार, सीरिजमधील iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये 6GB RAM असेल. या नव्या सीरिजमधील iPhone 14 Pro आणि  ‌iPhone 14 Pro Max या मॉडेल्समध्ये A16 चिप असेल, असा अंदाज लावला जात आहे. अॅपल विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी मार्चमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आयफोन 14 मध्ये A15 चिप असेल. 


काय असेल किंमत
Phone 14 Pro ची किंमत $1099 (रु. 87,910) पर्यंत असू शकते आणि iPhone 14 Pro Max ची किंमत $1199 (रु. 95,909) पर्यंत असू शकते. असा अंदाज आहे की,  Apple iPhone 13 miniची किंमत $300 (रु. 23,997) वाढू शकते.


Apple iPhone 14 सीरीज डिझाइन


iPhone 14 चा कॅमेरा बंप 4.17mm जाड किंवा iPhone 13 Pro Max पेक्षा 0.57mm मोठा असू शकतो. आयफोनच्या मागील बाजूस असलेल्या जागेचा आकार देखील पाच टक्क्यांनी वाढू शकतो.


हेही वाचा: