Titan EyeX : गेल्या वर्षी फेसबुकने रे बॅनच्या साथीनं एक स्मार्ट चष्मा बाजारात आणला होता. नजिकच्या काळात आणखीही काही मोठ्या कंपन्या त्या शर्यतीत दाखल होणार आहेत. या कंपन्याही आता स्मार्ट चष्मा घेऊन बाजारात दाखल होणार आहेत. टाटाच्या टायटन प्लसनं स्मार्ट चष्म्याच्या शर्यतीत एक पाऊल टाकलं असून, त्यांनी टायटन आय एक्स हा स्मार्ट चष्मा लॉन्च केला आहे. टायटनच्या  या स्मार्ट चष्म्यानं तुम्ही चक्क सेल्फी काढू शकता.


विशेष म्हणजे टायटनच्या या चष्म्यावर व्हॉईस कॉलिंगचाही पर्याय आहे. हा चष्मा स्मार्ट ग्लास ट्रू-वायरलेस असून, त्यात क्लियर व्हॉईस कॅप्चरसह ओपन इयर स्पीकर दिला आहे. ब्लू-टूथ व्हर्जन 5.0 या चष्म्यात देण्यात आलं आहे. या स्मार्ट चष्म्याद्वारे तुम्ही कॉल रिसिव्ह करू शकता किंवा रिजेक्टही करू शकता. तसंच गाणी ऐकू शकता. यासाठी स्मार्ट ग्लासच्या डाव्या आणि उजव्या बाजूला टच कंट्रोल देण्यात आलं आहे. हा स्मार्ट चष्मा मिडनाइट ब्लॅक रंगात असून, त्याची किंमत नऊ हजार 999 रुपये आहे.


Titan EyeX ची स्मार्ट ग्लास लाईटवेट आहे. स्मार्ट ग्लासमध्ये क्वालकॉम चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. स्मार्ट ग्लासमध्ये ऑडिओ, पेडोमीटर, टच कंट्रोल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सचा सपोर्ट दिला आहे.


स्मार्ट फीचर्स



  • बेस्ट इन क्लास ऑडिओ

  • टच कंट्रोल

  • फिटनेस ट्रॅकर

  • वॉईस इनबिल्ड आयकेअर नोटिफिकेशन्स

  • डीझाईन फॉर कम्फर्ट

  • अँड्रॉइड आणि IOS कनेक्टिव्हिटी

  • स्वीट रजिस्टेंस 

  • मल्टीपर्पज यूज - सनग्लास मोड, कम्प्युटर ग्लास मोड, स्पेक्टेकल मोड


इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Amazon Deal : अ‍ॅमेझोनची सर्वात मोठी डील, सॅमसंगच्या सगळ्यात महागड्या मोबाईलवर बंपर ऑफर, जाणून घ्या...