Amazon Offer On Samsung Galaxy Z Flip3 5G Phone : आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सॅमसंग (Samsung) फोन अग्रेसर आहे. फ्लिप फोन (Smasuung Galaxy Flip Phone) ही तर सॅमसंगची खासियत आहे. बाजारात सॅमसंगचे असे बरेच महागडे फोन आहेत जे फ्लिप आणि फोल्ड करून ते पॉकेटसारखे खिशातही अगदी आरामात बसतात. परंतु, सॅमसंगच्या या मोबाईलचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा मोबाईल बंद केल्यावरही तुम्हाला मोबाईलमध्ये एक छोटी स्क्रिन दिसते ज्याद्वारे तुम्ही नोटिफिकेशनदेखील पाहू शकता. तसेच, सेल्फी काढू शकता एवढेच नाही तर तुम्हाला आलेला मेसेजसुद्धा तुम्ही वाचू शकता. सॅमसंगच्या बाबतीत सांगायचं म्हणजे, असे मोबाईल हे प्रीमियम असतात आणि त्याचे फीचर्स यूजर्ससाठी अगदी साधे आणि समजण्यास सोपे असे ठेवले जातात. हा टचस्क्रिनचा मोबाईल लॅपटॉपच्या गतीने चालतो. विशेष म्हणजे यामध्ये मोबाईल स्टोरेजदेखील मोठ्या प्रमाणात आहे. या मोबाईलचा वापर अधिकतर प्रोफेशनल कामासाठी केला जातो. 


अ‍ॅमेझॉनवरील सॅमसंग मोबाईलची ऑफर नेमकी काय आहे?
Samsung Galaxy Z Flip3 5G या मोबाईलची किंमत आहे 95,999 रूपये परंतु, अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये हा फोन तुम्हाला केवळ 84,558 रूपयांत मिळणार आहे. म्हणजेच तब्बल 11 हजारांहून अधिक डिस्काउंटची ग्रेट डील तुम्हाला या फोनमध्ये मिळणार आहे. या मोबाईलमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज (8GB RAM, 128GB Storage) तुम्हाला विना ईएमआय मिळणार आहे. क्रेडिट कार्डने तुम्ही हा मोबाईल घेतल्यास तुम्हाला हजार रूपयांची सूटदेखील आहे. HSBC Credit Card ने पैसे भरल्यास 5% इंस्टंट डिस्काउंट आहे. या सगळ्या ऑफरनंतर मोबाईलवर तुम्ही 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील घेऊ शकता. 


Samsung Galaxy Z Flip3 5G मोबाईलचे फीचर्स



  • या मोबाईलमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळणार आहे.

  • या मोबाईलमध्ये दोन डिस्प्ले आहेत ज्यामध्ये फ्रंट डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे. यामध्ये डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. दुसऱ्या डिस्प्लेची साईझ 1.9 इंच आहे.

  • हा अतिशय यूजर फ्रेंडली फोन आहे ज्यामध्ये मोबाईल फोल्ड केल्यानंतरही तुम्ही टाईमर लावून सेल्फी काढू शकता.

  • व्हीडिओ कॉलसाठी किंवा मेसेजसाठी तुम्हाला मोबाईल फोल्ड करण्याची गरज नाही तर तुम्ही मोबाईलला फक्त फ्लिप करून वापरू शकता.

  • या मोबाईलमध्ये 5G सपोर्ट करणारा Qualcomm Snapdragon 888 Octa-Core प्रोसेसर आहे.

  • या मोबाईलमध्ये Android 11.0 ऑपरेटिंग सिस्टम आहे.

  • उत्कृष्ट आवाजाकरता मोबाईलमध्ये डॉल्बी स्टेरिओ स्पीकर्सदेखील Dolby Stereo Speakers दिले गेले आहेत.

  • या मोबाईलमध्ये दोन सिम आहेत ज्यामध्ये एक लहान आणि दूसरे ई-सिम आहे.

  • या मोबाईलमध्ये 10W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे आणि यामध्ये पॉवर शेयरचासुद्धा पर्याय दिला आहे ज्यामधून तुम्ही इतरांच्या डिवाईसचा वापर करून बॅटरी पॉवरदेखील घेऊ शकता.

  • हा मोबाईल जांभळा, क्रीम आणि काळा अशा आकर्षक रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha