मुंबई: नवा फोन घेतल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणं महत्त्वाचं असतं.


स्मार्टफोनचा डिस्प्ले महत्त्वाचा असतो. त्यामुळे स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी त्यावर चांगल्या दर्जाचं टेम्पर्ड ग्लास लावा. त्यामुळे फोनची स्क्रीन सुरक्षित राहून, त्यावर ओरखडे/स्क्रॅचेस पडणार नाहीत. तसंच फोन हातातून खाली पडल्यास टेम्पर्ड ग्लासमुळे वाचू शकेल.

मोबाईल सुरक्षेच्यादृष्टीने त्याला बॅक कव्हरही महत्त्वाचं आहे. सध्या बाजारात वेगवेगळे, स्टाईलिश मोबाईल कव्हर उपलब्ध आहेत. तुमच्या फोनला आवश्यक असलेलं बॅक कव्हर जरुर घ्या.

तुमच्या महागड्या स्मार्टफोनचा विमा उतरवू शकता. सध्या अनेक मोबाईल कंपन्या युझर्सना विमाही ऑफर करत आहेत. मोबाईल फुटला, पाण्यात पडला किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास विम्याचा पर्याय उपलब्ध आहे.

तुमच्या मोबाईलप्रमाणेच त्यातील डेटा अत्यंत महत्त्वाचा असतो. तुमचे मेसेज, फोटो आणि अन्य डेटा कोणीही पाहू नये, यासाठी Applock चा वापर करा. अँड्रॉईड मोबाईलधारक गुगल प्ले स्टोअरवरुन Applock डाऊनलोड करु शकतात. त्यानंतर आवश्यकेनुसार त्या-त्या अॅपला लॉक करु शकता.

स्मार्टफोन चोरीला गेल्यास, अथवा हरवल्यास मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं. मात्र तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर अँड्राईड डिव्हाईस मॅनेजर अॅक्टिव्ह ठेवल्यास, तुमच्या फोनचं लोकेशन सहज समजू शकेल. त्यासाठी स्मार्टफोनच्या Google Settings मध्ये जा, स्क्रोल डाऊन करुन Security सिल्केट करा, त्यानंतर Android Device Manager वर जा.

त्यानंतर Remotely locate this device आणि Allow remote lock and erase on or off वर टिक करा. मात्र त्यावेळी Location च्या सेटिंगमध्ये जाऊन Access to my location हे सुद्धा ऑन करणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय फोनमध्ये गुगल साईन इन होणंही गरजेचं आहे.

नवा फोन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी त्यामध्ये अँटी व्हायरस आणि डेटा सिक्युरिटी सॉफ्टवेअर इंस्टॉल करा. यामुळे तुमचा महत्त्वाचा सर्व डेटा सुरक्षित राहिल.