2017 च्या म्हणजे पुढल्या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात ड्रायव्हरलेस बस सिंगापूरमध्ये धावताना दिसेल. सुरुवातीला नानयान्ग टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटी (NTU) कॅम्पस आणि क्लिनटेक ईको-बिझनेस पार्कमध्ये चालवली जाणार आहे.
एनटीयूने आपल्या फेसबुक पेजवर अर्मा या ड्रायव्हरलेस बसचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात बस धावणार असल्याचेही पोस्टमधून सांगण्यात आले आहे.
‘अर्मा’ची वैशिष्ट्यं :
- बस तयार करणाऱ्या कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ‘अर्मा’मध्ये लिदार सेन्सर आणि कॅमेरा असेल, ज्यामुळे रस्त्यातील अगदी बारीक-सारीक अडथळे समजू शकतील आणि जीपीएसद्वारे ऑपरेशन स्टेशनमधून नियंत्रण करणाऱ्यांपर्यंत अडथळ्यांचा मेसेज पोहोचेल.
- ‘अर्मा’ विजेवर चालणारी ड्रायव्हरलेस बस असल्याने बॅटरी अर्धा दिवस चालू शकते. अर्थात बस किती अंतर पार करते आणि ट्राफिक स्थितीवरही अवलंबून असेल.
‘अर्मा’ काही पहिलीच ड्रायव्हरलेस बस नाही, याआधीही कॅम्पसमध्ये अशाप्रकारच्या बसची टेस्टिंग करण्यात आली होती. ‘अर्मा’हून अधिक प्रवासी क्षमतेच्या दोन ड्रायव्हरलेस बसचं याआधी क्लिनटेक पार्क आणि एनटीयूमध्ये टेस्टिंग करण्यात आली होते.
पाहा व्हिडीओ -