मुंबई : युट्युब विरुद्ध टिकटॉक प्रकरण हळूहळू वेगळं वळण घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसापासून प्रसिद्ध युट्युबर आणि टिकटॉकर यांचं शीतयुद्ध त्यांच्या चाहत्या वर्गातही पसरले आणि यातून त्यांना समर्थन देण्यासाठी अवघी तरुणाई सोशल मीडियावर उतरलेली पाहायला मिळतं आहे.


टिकटॉकचा आमिर आणि युट्युबर कॅरी यांच्या वादास पूर्णविराम युट्युबने कॅरीचा रोस्टिंग व्हिडीओ युट्युब वरून हटवून केला होता. पण झालं असं की, त्यांनंतरही हे दोघे आपाआपल्या बाजूने म्हणणं मांडत सर्वांच्या समोर येताना ते दिसले.हे प्रकरण ताजे असतानाच एका क्रिएटरने टिक टॉक व्हिडीओ मध्ये महिलेवर अॅसिड हल्लास समर्थन केलं होतं. याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिस महासंचालकांना आणि टिक टॉक इंडियाला पत्र लिहले, आणि त्याविरोधात कारवाई करण्याचाही मागणी सुद्धा केली.


या सोबतच, आज ट्वीटर वर #tiktokexposed #BanTikTokInIndia#TiktokDown असे ट्रेंड झालेले पाहायला मिळत आहे. भारतात टिक टॉकचे जवळजवळ 200 मिलियन वापरकर्ते आहेत. त्याच सोबत गुगल प्ले स्टोअरवरील टिक टॉकची रेटिंग घसरताना दिसत आहे. 16 मे ची रेटिंग ही 4.5 स्टार होती, ती 17 मे ला 3.8, 18 मे ला 3.2 आणि आज म्हणजेच 19 मे ला 2.0 स्टार्स वर आलेली पाहायला मिळाली.


व्हिडीओ करण्याचं स्वतंत्र आणि टिकटॉक युट्युब ने घालून दिलेल्या नियमांचे पालन हे न करता बहुतांश करोडो फॉलोवर्स असलेले क्रिएटर हे व्हिडीओ अधिक चालण्यासाठी वेगवेगळ्या खुबीने वापर करताना दिसतात. यात अलीकडे समोर आलेले व्हिडीओ मध्ये, प्राण्यांना त्रास देणं, धार्मिक जातीयवाद होऊ शकेल अश्या गोष्टी, महिला अत्याचारास समर्थन देणाऱ्या व्हिडीओसह विशेष गंभीर बाब म्हणजे कित्तेक अल्पवयीन मुलं मुली अश्लील व्हिडीओचे चैलेंज एकमेकांना देण्यात धन्यता मानताना दिसून येत आहे!


याचा फटका हा चांगल्या कलाप्रेमीं ना बसताना दिसून येईल. सोबतच टिक टॉक आणि युट्युब सोबतच इतर सोशल माध्यमांनी त्यांची धोरणं कडक करावी असा सूर नेटिझन्स करताना दिसत आहेत.


लॉकडाऊन च्या काळात सर्रासपणे पालक मुलांना मोबाईल, टॅब, संगणक हे अभ्यासासाठी आणि चांगल्या हेतूने देतात. पण याचा अधिक मोठ्या प्रमाणात आबालवृद्ध सुद्धा अशा सोशल माध्यमाचा चांगल्या प्रकारे आणि काहीअंशी वाईट, गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी वापर करताना दिसत आहे. सोशल माध्यमातून प्रत्येक वापरकर्ता काय करेल याच्यावर अंकुश लादणे आणि काय चांगले काय वाईट हे ठरवणं सध्याच्या स्थितीत अवघड झाल्याचं दिसत आहे.


संबंधित बातम्या :


BLOG | टिकटॉकर विरुद्ध युट्युबर