सॅन फ्रान्सिस्को : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरातील जवळपास सर्वच देश लॉकडाऊन आहेत. या विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने असे करण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. परिणामी अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत. यावर उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास परवानगी दिली आहे. ट्विटर या सोशल मीडिया कंपनीने तर यापुढेचं पाऊल उचललं आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी घरुन काम करण्यास ट्विटरने संमती दिली आहे.


कोरोनाचं संकट गेल्यानंतर कर्मचारी पुन्हा ऑफिसमध्ये येऊ शकतात, असेही कंपनीने सांगितले आहे. या महिन्याच्या सुरूवातीस गुगल आणि फेसबुकने त्यांच्या कर्मचाऱ्यांना हे वर्ष संपेपर्यंत घरून काम करण्यास परवानगी दिली आहे. ट्विटरने म्हटले, आहे की, आमचे कर्मचारी घरुन व्यवस्थित काम सांभाळू शकतात. त्यामुळे जर कर्मचाऱ्यांना कायम घरुन काम करायचं असेल तर ते करू शकतात. ट्विटरच्या कार्यालयात परत येण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कंपनी सावधगिरी बाळगून त्यांना प्रवेश देईल. सॅन फ्रान्सिस्को स्थित असलेल्या या कंपनीने आपल्या जगभरातील कार्यालयांमधून 4,000 हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. यामुळे कर्मचार्‍यांना मार्चपासून घरून काम करण्याची परवानगी मिळाली आहे. सप्टेंबरपूर्वी कार्यालये पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.


विशेष रेल्वेनंतर आता एअर इंडियाची देशांतर्गत विशेष विमान सेवा! मंगळवार, 19 मे पासून?


वर्क फ्रॉम होम संस्कृती येणार?
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद आहे. भारतातही गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. उद्योगधंदे बंद असल्याने लाखो लोक बेरोजगार झालेत. परिणामी उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं ज्या कंपन्यांना आणि कार्यलयांना घरुन काम करणे शक्य आहे, अशा कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी देण्याची विनंती सरकारने केली आहे. विदेशात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी दिली आहे. गुगल, फेसबुकने तर 2020 वर्ष संपेपर्यंत घरुन काम करण्यास सांगितले आहे. तर, ट्विटर कायम घरुन काम करू शकता, अशी ऑफरचं कर्मचाऱ्यांपुढे ठेवली आहे. त्यामुळे आगामी काळात वर्क फ्रॉम होम हे कल्चर आलं तर आश्चर्य वाटायला नको.


Lockdown 4.0 | लॉकडाऊन 4.0 कसं असेल? कुठल्या नियमांबाबत शिथिलता?