मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मोटोरोलाचा आगामी स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होणार याची स्मार्टफोन युजर्स वाट पाहत होते. अखेर बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Moto G9 भारतात लॉन्च झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टेकप्रेमींमध्ये या फोनच्या चर्चा रंगल्या होत्या. मोटो जी9 हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसोबत लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे. भारतात या फोनची किंमत 11,499 रुपये एवढी असणार आहे.


Moto G9 चे स्पेसिफिकेशन्स


Moto G9 ला 6.50 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं रिझॉल्यूशन 720x1600 एवढं असणार आहे. फोनमध्ये 2GHz octa-core क्वॉसकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटो जी9 मध्ये 4GB रॅम देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये 64GB स्टोरेजही देण्यात आलं आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबीपर्यंत वाढवलं जाऊ शकतं. या स्मार्टफोनमध्ये युजर्सना दोन कलर ऑप्शनमध्ये मिळणार आहे. ज्यामध्ये Forest Green आणि Sapphire Blue या कलर्सचा समावेश आहे.





बॅटरी


मोटोरोलाचा हा फोन अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत देण्यात आली आहे. हा फोन फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसर यांसारख्या फिचर्सनी परिपूर्ण आहे. कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचं तर यामध्ये ब्ल्यूटूथ, जीपीएस, व्हाय-फाय, रेडियो देण्यात आला आहे.





कॅमेरा


Moto G9 च्या कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाले तर या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त 8 मेगापिक्लसचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीचा असा दावा आहे की, स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या क्लासी फिचर्समुळे तुम्ही अंधारातही सुंदर फोटो काढू शकता.


Redmi 9 Prime सोबत स्पर्धा


Moto G9 ची स्पर्धा रेडमी 9 प्राइमसोबत असणार आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फउल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर लावण्यात आला आहे. हा फोन अॅन्ड्रॉइड 10 वर आधारित MIUI11 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करणार आहे. पावरसाठी याफोनमध्ये 10 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत 5,020 mAh ची बॅटरी लावण्यात आली आगे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, व्हाय-फाय, GPS, ब्लूटूथ वर्जन 5.0, FM रेडियो, 3.5 हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट टाइप-C यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. नव्या Redmi 9 Prime मध्ये रियरमध्ये चार कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची किंमत 11,999 रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या :