Top 10 Common Password: नेटबँकिंग, ई-मेल, ऑनलाइन पेमेंट अॅप यासह अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी पासवर्डचा वापर केला जातो. पासवर्डमुळे युजर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. लक्षात राहिल असा पासवर्ड अनेकजण ठेवतात. त्यामुळे हॅकर्स सहजपणे तुमचा पासवर्ड हॅक करुन तुमची वैयक्तिक माहिती चोरु शकतात. अथवा तुमच्या खात्यावरील रक्कम लंपास करु शकतात. त्यामुळे पासवर्ड तयार करताना काळजी घ्यावी लागते. प्रत्येकवर्षी सायबर सेक्युरिटी कंपन्या आणि अनालिटिक्स एजन्सीकडून कॉमन पासवर्डची यादी जाहीर केली जाते.  Nordpass कडून 2022 मधील सर्वात जास्त वापरले गेलेले आणि कॉमन पासवर्डची यादी जाहीर केली आहे.  


रिपोर्ट्सनुसार password हा पासवर्ड तब्बल 49 लाख लोकांनी वापरला आहे. यामध्ये भारतामधील 34 लाख लोकांचा समावेश आहे. भारतात दुसरा सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड 123456 हा पासवर्ड आहे. हा पासवर्ड 1,66,757 इतक्या वेळा वापरण्यात आला आहे. Bigbasket हा पासवर्ड 75,081 भारतीयांनी वापरला आहे. त्यामुळे पासवर्ड तयार करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. पासवर्ड तयार करता तेव्हा तुम्ही लक्षात राहावा म्हणून सोपा पासवर्ड सेट करता. पण याचमुळे तुम्ही सायबर फ्रॉडचे शिकार होऊ शकता. त्यामुळे पासवर्ड जितका अवघड ठेवता तितका सुरक्षित असतो. Nordpass कडून जारी केलेल्या सर्वात कॉमन पासर्वडची यादी पाहिल्यास तुम्हाला याची कल्पना येईल. 
 
भारतात सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड -
Password
123456
12345678
bigbasket
123456789
pass@123
1234567890
anmol123
abcd1234
googledummy



सुरक्षित पासवर्ड कसा असतो? (What is a strong password?)
अनेकजण पासवर्ड म्हणून आपलं ना, जन्मतारीख, फोन नंबर अथवा अन्य व्यक्तीगत माहितीचा वापर करतात. सायबर तज्ज्ञांच्या मते, असे पासवर्ड काही क्षणांत हॅक केले जाऊ शकतात. सुरक्षित पासवर्ड कसा असतो? सायबर तज्ज्ञांच्या मते, मजबूत आणि सुरक्षित पासवर्डमध्ये अक्षर, नंबर, स्पेशल कॅरेक्टर आणि इतर आणखी काही गोष्टींचा समावेश असावा. असे पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण आहे, पण अकाऊंट, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अवश्यक आहे. 
 
मजबूत पासवर्ड कसा सेट कराल? काय काळजी घ्यावी?
अक्षर, नंबर, स्पेशल कॅरेक्टरला एकत्रिक करुन पासवर्ड तयार करा.  
व्यक्तिगत माहिती पासवर्डमध्ये वापरु नये.  
वारंवार पासवर्ड बदला
एकच पासवर्ड पुन्हा पुन्हा वापरु नका.  
तुमचा पासवर्ड मोठा असू द्या.  
गुगल अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही  Google च्या “टू स्टेप व्हेरिफिकेशन” या फिचरचा वापर करू शकता. 
 लक्षात ठेवा, पासवर्ड हा कॉमन नसावा. पसवर्ड ठेवण्यासाठी क्रिअॅटिव्हपणे विचार करा.
एकाच पासवर्डचा वापर दोन अकाऊंटसाठी करू नये. दोन अकाऊट्सचा पासवर्ड सारखा ठेवल्याने तुमचे अकाऊंट हॅक होऊ शकते. 
तुमच्या आयुष्याशी निगडीत शब्दांचा वापर पासवर्ड ठेवताना करू नका. उदाहरण-
1. जन्म तारीख 
2. नाव
3. फोन नंबर 
4. स्पोर्ट्स टीमचे नाव