Common Charger: बदलत्या काळानुसार, डिजीटलायझेशमुळे देशात गॅझेटचा वापर वाढला आहे. मोबाईलसह, लॅपटॉप आणि टॅबलेटच्या चार्जरचा भार अनेकांना सांभाळावा लागतो. आता, लॅपटॉप, मोबाईलच्या चार्जरची कटकट संपणार आहे. मोबाईल, लॅपटॉपसाठी आता एकाच पद्धतीच्या चार्जरचा (Common Charger For Smart Devices) वापर सुरू होणार आहे. या गॅझेटच्या चार्जिंगसाठी 'युएसबी-सी'चा (USB-C) वापर करण्यात येणार आहे. संबंधितांवनी या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


ग्राहक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, एका बैठकीत संबंधितांनी स्मार्ट डिव्हाइससाठी एक कॉमन चार्जिंग पोर्टवर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता कॉमन चार्जिंग पोर्टचा मार्ग मोकळा झाला आहे. कमी किंमतीमधील फीचर फोनसाठी एक वेगळा पोर्ट असू शकतो, अशी माहिती आहे. केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीत मोबाईल उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यापार संघटना, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, आयआयटीचे अधिकारी, केंद्र सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, हा निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल, याबाबत स्पष्ट करण्यात आले नाही. 


ई-कचरा कमी होणार


एकाच पद्धतीच्या चार्जरमुळे ई-वेस्ट कमी होणार आहे. ASSOCHAM-EY च्या एका अहवालानुसार, वर्ष 2021 मध्ये भारतात 5 दशलक्ष टन ई-कचरा तयार होतो. सर्वाधिक ई-कचरा असणाऱ्या देशांच्या यादीत चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो.


टॅबलेट, स्मार्टफोन आणि लॅपटॉपसाठी यूएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्टचा वापर करणाऱ्या संबंधितांची मान्यता मिळाली. तर, कमी किंमतीमधील फीचर फोन्सना यातून वगळण्यात आले आहे. 


अॅपल फोनमध्ये येणार Type-C पोर्ट


एका वृत्तानुसार, अॅपलकडूनही आगामी आयफोनमध्ये USB Type-C पोर्ट असणार आहे. सध्या अॅपलच्या माध्यमातून लाइटनिंग पोर्टचा वापर करतात. आता आगामी मोबाईलमधून एकच चार्जर होणार असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


युरोपियन युनियनकडून (EU) गॅझेटसाठी एकच चार्जर असावा यासाठी प्रत्नन सुरू आहेत. ब्लूमबर्गने दिलेल्या एका वृत्तानुसार, युरोपियन युनियनने एक तात्पुरता कायदा मंजूर करत आयफोनसह युरोपियन युनियनमधील देशांमध्ये विक्री होणाऱ्या मोबाईलमध्य सी टाईप चार्जिंग पॉईंट असावे. वर्ष 2024 पर्यंत कॉमन चार्जरसाठी युरोपियन युनियन प्रयत्न करत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: