Digital Payment Platform: अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay) फोन पे (PhonePe) गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) या डिजिटल पेमेंट जगतात आता लवकरच स्पर्धा तीव्र होणार आहे. कारण मीठापासून ते स्टील उत्पादकापर्यंतचा आवाका असलेला अवाढव्य असा टाटा समूह आता डिजिटल पेमेंटच्या जगात पाऊल ठेवतो आहे. टाटाने युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय (UPI) पेमेंट अ‍ॅप Tata Neu लॉन्च केलं आहे.


 









टाटा समूह देशात स्वतःची युनायटेड पेमेंट्स इंटरफेस आधारित डिजिटल पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी मार्च महिन्यात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे अर्ज केला होता. टाटा समूहाने थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून काम करण्यासाठी एनपीसीआयकडे अर्ज केला होता.


हे अ‍ॅप वापरकर्त्यांना गुदल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये सर्व डिजिटल सेवा जशा की Bigbasket, 1MG, Croma, Tata Cliq आणि Tata Group च्या फ्लाइट बुकिंग सेवा एकाच अॅपमध्ये उपलब्ध करुन देत आहे. अत्याधुनिक डिजिटल माध्यमात ज्या काही सेवांची गरज असते ती या माध्यमातून पूर्ण होणार आहे.    


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha