iPhone 12 Pro Max : Apple iPhone 12 बाबतची प्रतिक्षा संपली असून Apple ने आपल्या Hi Speed इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरीज लॉन्च केली आहे. Apple ने आपल्या या इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरीजचे चार फोन लॉन्च केले आहेत. यामध्ये iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. हे सर्व आयफोन 5G कनेक्टिव्हिटीसोबत लॉन्च केले आहेत.
iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max 128GB, 256GB आणि 512GB मॉडेलमध्ये ग्रेफाइट, सिल्वर, गोल्ड आणि पेसिबल ब्ल्यूमध्ये उपलब्ध असणार आहेत. भारतात ग्राहक iPhone 12 प्रो मॅक्सला 129,900 रुपयांमध्ये Apple.com, अॅपल स्टोअर अॅप आणि अॅपल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे. iPhone 12 Pro Max हे आयफोनही रिसेलर्स आणि निवडक करियरच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
पाहा व्हिडीओ : अॅपलकड़ून iPhone-12 सीरिजचे चारही फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Apple चा iPhone 12 Pro Max मॉडेल 6.7 इंचाच्या रेटिना डिस्प्लेसोबत लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये 1284 x 2778 pixels आणि 19.5:9 ratio मध्ये डिस्प्ले देण्यात आला आहे. हा आयफोन 6GB रॅमसोबत तीन मेमरी स्टोरेज व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये 128GB इंटरनल मेमरीसोबत 6GB RAM, 256GB इंटरनल मेमरीसोबत 6GB RAM, 512GB इंटरनल मेमरीसोबत 6GB RAM व्हेरिएंट आहे.
iPhone 12 Pro Max 12MP अल्ट्रावाइड + 12 वाईड अँगल लेन्स + 12 टेलीफोटो लेंससह देण्यात आला आहे. iPhone 12 Pro Max मध्ये डीप फ्यूजन कॅमेरा फिचर आहे. सेल्फी लव्हरसाठी यामध्ये 12 MP वाईड अँगल लेंस कॅमेरा देण्यात आला आहे. इतर फिचर्समध्ये फेस आयडी, एक्सेलेरोमीटर, जायरो, प्रॉक्सिमिटी, कंपास, बॅरोमीटर, सिरी नॅचरल लँग्वेज कमांड आणि डिक्टेशनही देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :