मुंबई : एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सध्या चॅटिंगच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप प्रभावी माध्यम बनलं आहे. व्हॉट्सअॅपवर कुठेही, कधीही, कुणाशीही संवाद साधने अगदी सोपं झालं आहे. मात्र चॅटिंग करताना ती अधिक इंटरेस्टिंग बनवण्यासाठी इमोजी आणि जीफ फायल वापरल्या जातात. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. स्टिकर्सद्वारे आपली भावना व्यक्त करु शकतो. त्यामुळे आपला वेळ देखील वाचतो आणि कंटाळवाना मेसेजही लिहिण्यापासून वाचतो. स्टिकर्सचा पर्याय चांगला असला तरी ते स्टिकर्स कुठून मिळवायचे किंवा कसे डाऊनलोड करायचे याची अनेकांना फारशी माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅट दरम्यान स्टिकर कसे वापरयाचे आणि कसे डाउनलोड करायचे हे सांगणार आहोत.


डिलीट केलेलं WhatsApp chat परत कसं मिळवलं जाऊ शकतं?


व्हॉट्सअॅप स्टिकर्स कसे डाउनलोड करावे?




  • सर्वात आधी आपले व्हॉट्सअॅप उघडा. आता आपण पाठवू इच्छित असलेल्या स्टिकरची चॅट उघडा.

  • येथे मेसेज टाईप करण्यासाठी क्लिक करा आणि इमोजीवर क्लिक करा.

  • तेथे 3 पर्याय दिसतील, ज्यात इमोजी, जीआयएफ आणि तिसरा पर्याय स्टिकर असेल.

  • आपल्याला येथे बरेच प्रकारचे स्टिकर दिसतील. आपण आपल्या गरजेनुसार कोणतेही स्टिकर पाठवू शकता.

  • वेगवेगळ्या प्रकारचे अधिक स्टिकर्स हवे असल्यास तेथील शेवटच्या प्लस चिन्हावर क्लिक करा.

  • त्यानंतर आपल्या आवडीच्या स्टिकरवर डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून ते डाऊनलोड करु शकता.

  • तुमच्या आवडीचे स्टिकर आपल्या Favorite स्टिकर्समध्येही जोडू शकता.

  • यासाठी, तुम्हाला स्टिकरला थोडा वेळ टच करावं लागेल. त्यानंतर ते तुम्ही तुमच्या Favorite स्टिकरमध्ये जोडू शकता.


महत्त्वाच्या बातम्या :