Samsung Galaxy M12 : सॅमसंगचा बहुप्रतिक्षित Samsung Galaxy M12 स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. आज दुपारी 12 वाजता Samsung Galaxy M12 हा फोन एका इव्हेंटमध्ये लॉन्च होणार आहे. सॅमसंगचा हा फोन (Amazon) अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Samsung Galaxy M12 च्या विक्रीसाठी मायक्रो साइट देखील लाईव्ह करण्यात आली आहे. भारतात Samsung Galaxy M12  ची किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. 


Samsung Galaxy M12  फोनची वैशिष्ट्ये 


Samsung Galaxy M12 मध्ये 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. ज्याचा रिजोल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. ड्युअल सिम सपोर्ट असणारा हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित One UI Core आधारित आहे. फोनमध्ये TFT इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले आहे. यात Exynos 850 प्रोसेसर आणि तीन वेरिएंट देण्यात आहेत. ज्यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असे पर्याय देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने त्याचे स्टोरेज एका टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.



Samsung Galaxy M12 चा कॅमेरा


Samsung Galaxy M12 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. f/2.0 अपर्चरसह 48 एमपी मेन कॅमेरा आहे. दुसरा कॅमेरा 5 एमपी अल्ट्रा वाइड लेन्स, ज्यामध्ये अपर्चर f/2.2 आहे आणि तिसरा आणि चौथ्या लेन्स 2 एमपी डेप्थ सेन्सर, मायक्रो लेन्स आहेत. यात 8 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.



बॅटरी आणि इतर वैशिष्ट्ये


Samsung Galaxy M12 मध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 4G नेटवर्कवर 58 तास बॅकअप देते. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे, 4 जी LET, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि पॉवर बटणावर 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे.