मुंबई : मोबाईल प्रेमींसाठी एक अत्यंत उत्साहाची बातमी सध्या पाहायला मिळत आहे. मोबाईल विश्वात अनेकांसाठीच हव्याहव्याश्या वाटणाऱ्या अशा OnePlus 9 seriesचं लाँच करणार असल्याचं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. 23 मार्चला जागतिक स्तरावर ही सीरिज लाँच करण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये एकूण तीन मोबाईल हँडसेट असणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये OnePlus 9, the top-end OnePlus 9 Pro आणि OnePlus 9e चा समावेश आहे.


OnePlus चे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष Pete Lau यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. शिवाय त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत या फोनचा फर्स्ट लूकही सर्वांच्या भेटीला आणला. इतकंच नव्हे तर, या कंपनीकडून येत्या काळासाठी Hasselblad या कॅमेरा निर्मिती करणाऱ्या कंपनीशी पार्टनरशीप केल्याची घोषणाही करण्यात आली.


Corona Alert | 'या' ठिकाणी प्रवास करण्यासाठी ई- पास बंधनकारक


सूत्रांच्या माहितीनुसार 3 वर्षांसाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. मोबाईलमधील कॅमेऱ्यामध्ये यामुळं आणखी अद्ययावर सुविधा देण्यात येणार आहेत. नव्या OnePlus 9 series मध्ये कॅमेराच्या उद्देशानं युजर्सना अद्वितीय अनुभव घेता येणार आहे.


मोबाईल सीरिजची काही वैशिष्ठ्य


सदर सीरिजमध्ये OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9e हे तीन फोन लाँच करण्यात येणार आहेत. यामध्ये Hasselblad Pro Mode देण्यात आला आहे. ज्यामुळं प्रोफेशनल फोटोग्राफर्स हे त्यांच्या अनुशंगानं फोटो टीपण्यास याचा वापर करु शकतील. यामध्ये युजर्सना ISO, focus, exposure, white balance आणि इतरही फिचर्स देण्यात आले आहेत.








वन प्लसच्या या फोनमध्ये Snapdragon 888 chipset, 12GB पर्यंतचा RAM, 256GB ची इंटरनल स्टोरेज मेमरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याचंही म्हटलं जात आहे. या फोनमध्ये custom Sony IMX789 sensor आणि 12-bit RAW support ही असणार आहे. फोनच्या किंमतीबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, भारतात या फोनचे दर 46,999 रुपयांच्या घरात असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.