मुंबई : चिनी कंपनी Xiaomiने आपल्या  Mi 10 सीरिज अंतर्गत आज नवा स्मार्टफोन Mi 10s लॉन्च केला आहे. हा सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. फोन भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता लॉन्च करण्यात आला. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर देण्यात येऊ शकतो, ज्यामुळे याचा फरफॉर्म आणखी जास्त वाढू शकतो. असं मानलं जातं की, या फोनचं डिझाइन Mi 10 Ultra प्रमाणे असू शकतो. जाणून घेऊया फोनचे स्पेसिफिकेशन्स...


संभाव्य स्पेसिफिकेशन्स 


लीक रिपोर्टनुसार, या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स Mi 10 5G प्रमाणे असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. असं मानलं जात आहे की, फोनचा डिस्प्ले असाच असू शकतो. याव्यतिरिक्त फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्याचसोबत 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेऱ्या व्यतिरिक्त 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. 


Harmon Kardon चे असणार स्पीकर्स 


याव्यतिरिक्त फोनमध्ये Harmon Kardon चे स्पीकर मिळू शकतात. हा फोन तीन कलर ब्लॅक, व्हाइट आणि ब्लूमध्ये लॉन्च केलं जाऊ शकतं. पॉवरसाठी फोनमध्ये 4680mAh ती बॅटरी देण्यात येऊ शकते. जी 33 W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. 


Oppo F19 Pro शी होणार स्पर्धा 


Mi 10s ची स्पर्धा Oppo F19 Pro शी होणार आहे. Oppo F19 Pro मध्ये 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्याचं रिझॉल्यूशन  2400 x 1800 पिक्सल आहे. याच्या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लासचं प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. फोनमध्ये MediaTek Helio P95 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोन अॅन्ड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतं. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहेत. ज्याला तुम्ही मायक्रो कार्डच्या मदतीने 256 GB पर्यंत वाढवलं जाऊ शकतं. अशातच फोनची किंमत 21,490 रुपये आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :