Tech News : स्मार्टफोन कंपनी मोटोरोला आज आपल्या दोन नवीन स्मार्टफोन मोटो जी 10 पॉवर (Moto G10 Power) आणि मोटो जी 30 (Moto G30) ला भारतात लॉन्च करणार आहे. हे दोन्ही फोन आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर लॉन्च केले जाणार आहे. यापूर्वी युरोपमध्ये पहिले मोटो जी 10 आणि मोटो जी 30 स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. आता कंपनी दोन्ही फोन भारतीय बाजारात आणणार आहे. Moto G10 Power आणि Moto G30 या दोन्ही फोनची वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.


मोटो जी 10 पॉवरची वैशिष्ट्य


मोटो जी 10 पॉवरमध्ये 60 हर्ट्ज रीफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी आहे. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे देखील वाढवले जाऊ शकते.


मोटो जी 10 पॉवर कॅमेरा


या फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 48 एमपी प्राइमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर आहेत. फोनमध्ये 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीसाठी, यात 10 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. तसेच, 4G, वाय-फाय, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आल्या आहेत.


OnePlus 9 Series Launch | कधी लाँच होणार वन प्लस 9 सीरिज; जाणून घ्या किंमत आणि इतर सर्व माहिती


मोटो जी 30 वैशिष्ट्ये


मोटो जी 30 स्मार्टफोन फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले  देण्यात आला आहे. ज्याचा रिझोल्यूशन 1600 x 720 पिक्सल आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. जो मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने देखील वाढवला जाऊ शकतो.


OnePlus 9 सीरिज लवकरच लॉन्च होणार, काय असतील स्पेसिफिकेशन?


मोटो जी 30 कॅमेरा


क्वाड कॅमेरा सेटअप मोटो जी 30 मध्ये देण्यात आला आहे. ज्यात 64 एमपी प्राइमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर आहेत. सेल्फीसाठी यात 13 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याच्या बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचं तर या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4 जी, वाय-फाय, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट अशी वैशिष्ट्ये आहेत.


Moto G10 Power आणि Moto G30 किंमत काय असू शकते?
 
सध्या भारतात या दोन स्मार्टफोनची किंमत काय असेल याबद्दल माहिती नाही. परंतु युरोपमध्ये मोटोरोलाच्या मोटो जी 30 ची किंमत 180 युरो म्हणजेच सुमारे 15,900 रुपये आहे. त्याचबरोबर मोटो जी 10 ची किंमत 150 युरो म्हणजेच सुमारे 13,300 रुपये आहे. अशा परिस्थितीत भारतात या दोन फोनची किंमत 10,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते, असा अंदाज आहे.