‘मॅकटेक डॉट कॉम’नुसार आयफोन SE ची भारतातील किंमत 48 हजार रुपये असणार आहे. मात्र, याबाबत औपचारिक माहिती घोषणा झालेली नाही. मात्र, 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 50 हजार रुपयांच्या जवळपास असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
iPhone 5S ची वैशिष्ट्ये-
- iPhone 5S ची बॉडी अॅनोडाईज्ड अॅल्युमिनीअमपासून बनवलेली आहे.
- iPhone 5S हा करडा (ग्रे), चंदेरी (सिल्व्हर) आणि सोनेरी (गोल्ड) अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
- iPhone 5S चं बलस्थान म्हणाल या फोनमध्ये असलेला 64 बिट फोन प्रोसेसर हे आहे.
- iPhone 5S मधील कॅमेराही सर्वोत्कृष्ट आहे. मोबाईल फोटोग्राफरसाठी iPhone 5S हा एक सर्वोत्तम फोन आहे. याचा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा असला तरी त्यामध्ये पाच इलेमेन्ट लेन्स आहे. मोठा सेन्सर आणि अद्ययावत इमेज प्रोसेसिंग या कॅमेऱ्यांमध्ये आहे.
- iPhone 5S मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे फिंगरप्रिंट सेन्सर…
iPhone 5S मध्ये त्याला टच आयडी असं नाव देण्यात आलंय. तुमच्या बोटांचे ठसे हे तुमच्यासाठी पासवर्डचं काम करतील. स्क्रीनवर फक्त बोटे टेकवल्याने तुम्ही लॉग इन स्क्रीनला बायपास करून फोन सुरू करू शकता. तसंच आयट्यून्सची खरेदी करू शकता. iPhone 5S मध्ये असलेल्या कोअरमोशन एपीआय मुळे तुम्ही आरोग्य आणि स्वास्थ्याविषयीच्या अॅपचा फायदा घेऊ शकता. म्हणजे तुही सुरक्षितता आणि अॅप्सला प्राधान्य देणारे असाल तर तुम्ही iPhone 5S ची निवड करणं योग्य असेल.
- ‘आयफोन SE’बाबत अधिक माहिती:
- टच आयडी
- 12 मेगापिक्सेल कॅमेरा
- 4k व्हिडीओ क्षमता
- A9 प्रोसेसर
- M9मोशन प्रोसेसर
- वायफाय कॉलिंग
- आयफोन 5S पेक्षा तीन पटीने वेगवान