एअरटेल गर्ल पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर साशा ट्रेण्डिंगमध्ये
एबीपी माझा वेब टीम | 04 Apr 2016 03:12 PM (IST)
मुंबई : एअरटेल गर्ल अर्थात साशा छेत्री पुन्हा एकदा चर्चेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात एअरटेलचं नेटवर्क मिळतं, असा दावा करणारी साशा वादाता सापडली असून सोशल मीडियावर तिच्याबाबत अनेक बातम्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये साशाविरोधात खटला दाखल झाल्यापासून ती एअरटेल सोडून रिलायन्स जिओमध्ये सामील झाल्याचं म्हटलं जात आहे. सत्य काय आहे? साशाने एअरटेल 4G सोडून रिलायन्स जिओ जॉईल केल्याचं वृत्त microfinancemonitor.com ने तीन दिवसांपूर्वी छापलं होतं. यानंतर ती सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये होती. नेटीझन्सनी साशाबाबत अनेक कमेंट्स केल्या. खरंतर या बातमीद्वारे लोकांना एप्रिल फूल बनवलं जात होतं. "साशाने एअरटेल सोडलं कारण सिग्नल व्यवस्थित न आल्याने मियाम लेकवर राहणाऱ्या एका व्यक्तीला भारत-वेस्ट इंडिज सामना पाहता आला नाही. त्यामुळे त्याने एअरटेल आणि साशाविरोधात खोटा दावा केल्याचा खटला दाखल केला," असं वृत्त microfinancemonitor.com ने छापलं होतं.