Password : नेटबँकिंग, ई-मेल, ऑनलाइन पेमेंट अॅप इत्यादी गोष्टींचा वापर सध्या अनेक लोक करत आहेत. या सर्व गोष्टींच्या सुरक्षेसाठी पासवर्डचा वापर केला जातो. पासवर्डमुळे यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. लक्षात राहिल असा पासवर्ड ठेवण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. पण काही लोक हॅकर्स सहजपणे हॅक करू शकतील असा पासवर्ड ठेवतात. अकाऊंट जर हॅक झाले तर तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पासवर्ड ठेवताना ही काळजी घ्या-
असा असावा पासवर्ड-
पासवर्ड नेहमी 12 कॅरेक्टर्सचा असावा त्यामध्ये किमान एक कॅपिटल लेटर, एक संख्या आणि एक स्पेशल कॅरेक्टर असावे (“@”, किंवा “%” ) .
पासवर्ड ठेवताना ही घ्या काळजी
1. अकाऊंट सुरक्षित राहण्यासाठी त्या अकाऊंटचा पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा.
2.कधीही एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा
3.तुमचा पासवर्ड मोठा असू द्या.
4.गुगल अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही Google च्या “टू स्टेप व्हेरिफिकेशन” या फिचरचा वापर करू शकता.
लक्षात ठेवा, पासवर्ड हा कॉमन नसावा. पसवर्ड ठेवण्यासाठी क्रिअॅटिव्हपणे विचार करा. उदाहरण-
Bad: Fuzzydog82
Better: %FuZZyD0G#8254!
Best: myFuzzyDog-eats4bones!Aday-BIG$
या गोष्टींचा पासवर्ड ठेवू नका-
तुमच्या आयुष्याशी निगडीत शब्दांचा वापर पासवर्ड ठेवताना करू नका. उदाहरण-
1. जन्म तारीख
2. नाव
3. फोन नंबर
4. स्पोर्ट्स टीमचे नाव
एकाच पासवर्डचा वापर दोन अकाऊंटसाठी करू नये. दोन अकाऊट्सचा पासवर्ड सारखा ठेवल्याने तुमचे अकाऊंट हॅक होऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Google For India : सर्च रिझल्ट आता वाचण्याची गरज नाही, Google बोलून दाखवणार, जबरदस्त फीचर येणार
Hyundai Motor लवकरच भारतात लाँच करणार 6 इलेक्ट्रिक कार, फक्त 18 मिनिटांत होणार चार्जिंग