नवी दिल्ली : जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत असतानाच आता ह्युंदाई मोटर्सनेही (Hyundai E-GMP) भारतात आपल्या 6 इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. ह्युंदाई मोटर्सने काल याबाबत अधिकृत घोषणा केली. यासाठी ह्युंदाई चार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. ह्युंदाई कारने ई-जीएमपी E-GMP(इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म) वर आधारित पूर्ण नव्या मॉडेसह या कार भारतात लाँच करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. 


इलेक्ट्रिक कारला वेगळ्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते. पेट्रोल/डिझेलवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार बनवत असताना त्यामध्ये तडजोडी केल्या जातील. त्यामुळे  ह्युंदाईने त्यांच्या इलेक्ट्रिक कारसाठी ई-जीएमपी प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ई-जीएमपी हा इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक नवा प्लॅटफॉर्म आहे. त्यात बॅटरी, मोटर आणि पॉवर इलेक्ट्रिक सिस्टिमसह त्याच्या स्केलेबल व्हीलबेसचा समावेश असेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे E-GMP सारखे प्लॅटफॉर्म असल्यामुळे 800 व्होल्टेज क्षमता असलेली चार्जिंग सुविधा या वाहनांमध्ये असेल. 


इलेक्ट्रिक कार या पारंपारिक कारपेक्षा वेगळ्या असतात. या कारची केबिन मोठी असून कारमध्ये जास्त जागा असते. त्यामुळे इलेक्ट्रिक कार घेणाऱ्या ग्राहकांना नव्या फिचर्सह कमी खर्चात कार वापरण्याचा अनुभव मिळणार आहे. 
 
फक्त 18 मिनिटांत होणार चार्जिंग
ह्युंदाई भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत मोठी भरारी घेईल. ग्राहाकांच्या पसंतीस उतरतील अशी मॉडेल तयार करण्यावर भर असेल. ही कार फक्त 18 मिनिटांत 80 टक्के क्षमतेने चार्गिंग होणार असून एकदा चार्गिंग केल्यानंतर ती 550 किलोमीटरपर्यंत चालेल.  


भारतात इलेट्रिक वाहनांचा विस्तार करण्यासाठी कंपनी खूप मेहनत घेत असून पुढील वर्षात या कारच्या उत्पादनाला सुरूवात करण्यात येणार आहे. तर 2028 पर्यंत ही कार प्रत्यक्षात बाजात येईल, अशी माहिती ह्युंदाईने दिली आहे.  


संबंधित बातम्या 


New Volkswagen Tiguan : फोक्सवॅगनची शानदार टिगुआन कार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स 


Gold Silver Price Today 9 December 2021: सोने, चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर


900 जणांना नोकरीवरुन काढणाऱ्या बॉसला उपरती, माफी मागत म्हणाला...


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI