Research on Password : नेटबँकिंग, ई-मेल, ऑनलाइन पेमेंट अॅप इत्यादी गोष्टींचा वापर सध्या अनेक लोक करत आहेत. या सर्व गोष्टींच्या सुरक्षेसाठी पासवर्डचा वापर केला जातो. पासवर्डमुळे यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. लक्षात राहिल असा पासवर्ड ठेवण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. नुकताच  NordPass यांनी रिपोर्ट जाहिर केला आहे. या रिपोर्टनुसार भारतातील अनेक लोक या शब्दांचा वापर पासवर्ड ठेवण्यासाठी करतात असे लक्षात आले आहे. जाणून घेऊयात या शब्दांबाबत...


   अनेक लोक या शब्दांचा पासवर्ड म्हणून वापर करतात 


NordPass यांच्या रिसर्चनुसार भारतामध्ये,  ‘Password’ या शब्दाचा वापर लोक पासवर्ड ठेवण्यासाठी सर्वाधिक करतात. केवळ भारतातच नाही तर जगभरातच हा शब्द लोक पासवर्ड म्हणून ठेवतात. तसेच भारतातील अनेक लोक त्यांच्या नावाचा किंवा त्यांच्या जोडीदाराच्या नावाचा वापर पासर्वड ठेवण्यासाठी करतात. रिसर्चनुसार, भारतामध्ये  iloveyou, Krishna, sairam आणि omsairam या शब्दांचा पासवर्ड ठेवणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. तसेच भारतात, 123456789, 12345678, india123, qwerty, abc123, xxx, indya123, 1qaz@WSX, 123123 आणि abcd1234 Qj 1qaz या संख्यांचा पासवर्ड सेट करण्याासाठी सर्वाधिक वापर केला जातो. 
 
जगात या शब्दांचा पासवर्ड म्हणून सर्वाधिक वापर
रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की, जगात QWERTY या शब्दाचा वापर पासवर्ड म्हणून सर्वाधिक केला जातो. तसेच 50 पैकी 43 देशांमधील लोकांनी '123456'  या पासवर्डला पसंती दिली आहे.


पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या सोप्या टिप्स


1. आपला पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा.


2.कधीही एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा


3.तुमचा पासवर्ड मोठा असू द्या. पासवर्डमध्ये किमान आठ कॅरेक्टर अवश्य द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Google For India : सर्च रिझल्ट आता वाचण्याची गरज नाही, Google बोलून दाखवणार, जबरदस्त फीचर येणार


Mobile Use: मोबाईलवर वेळ घालवण्यात इंडोनेशिया पहिल्या स्थानावर, भारताचा क्रमांक कितवा?


भारतात Google चा मोठा इव्हेंट आज, नव्या फीचर्ससह विविध प्लॅन्सही जारी करणार कंपनी


Google New Feature: आता तुमचे फोटो आणि व्हिडीओ लपवता येणार; गुगलचं नवीन फीचर